विठोबाची भेट घेऊन मुक्ताई पालखीने जड अंतकरणाने सुरू केला परतीचा प्रवास..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 11:30 AM2020-07-02T11:30:38+5:302020-07-02T11:33:16+5:30
आषाढी वारी विशेष; जड अंतकरणाने घेतला पंढरीचा निरोप
Next
ठळक मुद्दे- पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा झाला उत्साहात- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांविना झाली आषाढी वारी- यंदा वारकºयांनी घरच्या घरीच साजरी केली आषाढी वारी
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या एकादशी सोहळ्या उरकून मुक्ताई पालखीने जड अंतकरणाने पंढरीचा निरोप घेतला आहे. सकाळी अकराच्या सुमारास मुक्ताई मठापासून परतीचा प्रवास सुरू केला आहे.
दशमी दिवशी मुक्ताई पालखीने रात्री पंढरपूर मध्ये प्रस्थान केले. आषाढी एकादशी दिवशी पादुका स्नान, नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. द्वादशी दिवशी विठ्ठलाचे भेट घेऊन पंढरीची निरोप घेतला. शासनाने योग्य नियोजन केल्याबाबत प्रशासनाची आभार पालखी सोहळा प्रमुखांनी मांडले आहे. त्याचबरोबर पौर्णिमेच्या अगोदर विठोबाचा निरोप घेत असल्यामुळे दु:ख होत असल्याचे श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रविंद्र पाटील यांनी सांगितले.