तब्बल १० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळाला पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:26 AM2021-09-24T04:26:08+5:302021-09-24T04:26:08+5:30
सांगोला ग्रामीण रुग्णालयाचा दहा वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांवर दैनंदिन कारभार सुरु होता. त्यामुळे ...
सांगोला ग्रामीण रुग्णालयाचा दहा वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांवर दैनंदिन कारभार सुरु होता. त्यामुळे सांगोला ग्रामीण रुग्णालयास पूर्णवेळ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक कधी मिळणार? याकडे रुग्णांचे लक्ष लागले होते. अखेर डॉ. शंभूराजे साळुंखे-पाटील वैद्यकीय अधिकारी म्हणून ग्रामीण रुग्णालयात रुजू होत आहेत. बालरोग तज्ज्ञ डॉ. शंभूराजे साळुंखे-पाटील यांनी मागील दोन वर्षांपूर्वी शिरोळ (कोल्हापूर) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार घेतला होता.
सांगोला ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोविड आरोग्य सेंटर कार्यान्वित आहे. शहरातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी देखील या रुग्णालयावर आहे. कोरोनाची आरटीपीसीआर व अँटिजन टेस्ट ही या रुग्णालयाच्या नियंत्रणाखाली केल्या जात आहेत. सध्या शहरातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी परिस्थिती संपूर्ण निवळली नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालय सर्व बाबतीत सुसज्ज असणे गरजेचे आहे.
कोट :::::::::::::::::::::
सांगोला ग्रामीण रुग्णालय हे शासनाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयामधून शासनाच्या सर्व आरोग्य सेवा आणि सुविधा जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न राहील. रुग्णांची आरोग्य विषयी गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- डॉ. शंभूराजे साळुंखे-पाटील
वैद्यकीय अधिकारी