लेखी आश्वासनानंतर तिसंगी तलावातील आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:22 PM2018-10-27T16:22:17+5:302018-10-27T16:27:53+5:30
अखेर अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पंढरपूर : सांगोला तालुक्यातील आजी-माजी आमदार तिसंगी आंदोलनात उतरले होते़ शुक्रवारी रात्री आमदार गणपतराव देशमुख आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह इतर आंदोलक कालव्याच्या गेटवर उपोषणास बसले आहेत. शनिवारी सकाळी अधिक्षक अभियंता ए़ पी़ निकम यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
शेतकºयांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी रात्रभर हे उपोषण करण्यात आले़ लोकप्रतिनिधीच या प्रकरणात उतरल्यामुळे आंदोलनाला धार आली आहे. नीरा-भाटघर धरणाचे पाणी तिसंगी सोनके तलावात सोडावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. या भागातील शेतकºयांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने पाणी सोडावे, अन्यथा शेतकºयांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता अखेर अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आ़ गणपतराव देशमुख, आ़ भारत भालके, माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, शहाजीबापू पाटील, कल्याणराव काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समाधान फटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.