मंदिरात जमा झालेल्या निर्माल्यापासून तयार होणार अगरबत्ती अन् धूप

By दिपक दुपारगुडे | Published: June 22, 2024 08:12 PM2024-06-22T20:12:03+5:302024-06-22T20:12:17+5:30

...यापुढे या निर्माल्यापासून अगरबत्ती व धूप तयार करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Agarbatti and incense will be prepared from the nirmala collected in the temple | मंदिरात जमा झालेल्या निर्माल्यापासून तयार होणार अगरबत्ती अन् धूप

मंदिरात जमा झालेल्या निर्माल्यापासून तयार होणार अगरबत्ती अन् धूप

दीपक दुपारगुडे 
सोलापूर  : विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. आलेले भाविक देवाला हार, फुले वाहतात. मंदिर समितीकडे दररोज अंदाजे एक ते दीड टन निर्माल्य जमा होते. यापुढे या निर्माल्यापासून अगरबत्ती व धूप तयार करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेश कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख-जळगावकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव महाराज मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

मंदिरात जमा होणारे निर्माल्य एक खासगी व्यक्ती स्वखर्चाने घेऊन जाणार आहे. त्या निर्माल्यापासून अगरबत्ती व धूप तयार करणार आहे. तयार झालेली अगरबत्ती व धूप विक्रीतून जमा होणारी २० टक्के रक्कम मंदिर समितीला देणार आहे. शासकीय महापूजेवेळी गाभा-यातील उपस्थितांच्या संख्येबाबत जिल्हा प्रशासनाचे अभिप्राय घेणे, गाभारा, तसेच विठ्ठल सभामंडप, बाजीराव पडसाळी येथील सर्व कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करणे, मंदिर समितीच्या सन २०२४-२५ च्या ७६ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी, मंदिर समितीच्या जमिनी खंडाने देण्याबाबत लिलाव प्रक्रिया राबविणे, तसेच १५ व्या वित्त आयोगांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिरासाठी श्रीसंत ज्ञानेश्वर दर्शन मंडप व श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे मोफत जागा उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्यामुळे भाविक व नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
 

Web Title: Agarbatti and incense will be prepared from the nirmala collected in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.