तंत्रनिकेतनच्या बचावसाठी विद्यार्थ्यांचे पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन, विद्यार्थ्यांची अटक व सुटका

By admin | Published: April 11, 2017 03:27 PM2017-04-11T15:27:20+5:302017-04-11T15:27:20+5:30

.

Agitation, arrest of students and release of students before the guardian's office to protect the technician | तंत्रनिकेतनच्या बचावसाठी विद्यार्थ्यांचे पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन, विद्यार्थ्यांची अटक व सुटका

तंत्रनिकेतनच्या बचावसाठी विद्यार्थ्यांचे पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन, विद्यार्थ्यांची अटक व सुटका

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : शासकीय बंद करू नका या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले़ यावेळी शहर पोलीसांनी विना परवानगी आंदोलन केल्यामुळे विद्यार्थ्यांना अटक करून सुटका केली़
महाराष्ट्र शासनाने सोलापूरसह राज्यातील सहा ठिकाणीचे तंत्रनिकेतन बंद केले आहे़ दरम्यान त्याठिकाणी अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़ याला विविध शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटनांचा विरोध आहे़ मागील काही दिवसांपासून तंत्रनिकेतन बचावासाठी विविध आंदोलने, मंत्रालयीन स्तरावरील मंत्री,अधिकाऱ्यांना तंत्रनिकेतन सुरू रहावे यासाठी मागणी करण्यात येत आहे़ मात्र मंगळवार ११ एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास दत्त चौक परिसरातील पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांना घोषणाबाजी देत आंदोलन केले़ यावेळी पोलीसांनी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं़ दरम्यान, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आंदोलन कार्यकर्त्यांना भेटीसाठी व चर्चेसाठी बोलविले असून चर्चा करून प्रश्न सोडवू असेही सांगण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले़

Web Title: Agitation, arrest of students and release of students before the guardian's office to protect the technician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.