भाजप पदाधिकाऱ्याचे आंदोलन ही नौटंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:24 AM2021-08-26T04:24:41+5:302021-08-26T04:24:41+5:30

शहरातील सांगोला नाका परिसरात बगीचा विकसित करण्याचे काम सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक ...

The agitation of BJP office bearers is a gimmick | भाजप पदाधिकाऱ्याचे आंदोलन ही नौटंकी

भाजप पदाधिकाऱ्याचे आंदोलन ही नौटंकी

Next

शहरातील सांगोला नाका परिसरात बगीचा विकसित करण्याचे काम सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक याचा पुतळा त्या जागेत बसविण्याचे असताना, त्या जागेत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने अतिक्रमण करत, त्या सदर ठिकाणी बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय सुरू केला. पदाधिकाऱ्यांचे अतिक्रमण वाचविण्यासाठी आमदार व इतर पदाधिकाऱ्याची इच्छा नसतानाही त्यांना व पक्षाला वेठीस धरून स्वत:च्या स्वार्थासाठी आंदोलनाचे स्टंट करीत आहेत. दामाजी पुतळा सुशोभीकरणाचे काम भाजपच्या एका कार्यकर्त्यांने घेतले आहे. काम सुरू करण्याचे आदेशही दिले आहे, तसेच भाजी मंडईतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास नोटीस दिली. शहा बँकेसमोरील मोकळ्या जागेमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून अतिक्रमण होऊ नये, म्हणून कठडा बांधण्याचे काम व माजी नगराध्यक्ष स्व.रतनचंद्र शहा यांच्या पुतळाचा चबुतरा बांधकामाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यास जाणूनबुजून विरोध करीत असल्याचेही माळी यांनी सांगितले.

...............

विघ्नसंतोषी लोकांना पाठीशी घालू नका

स्वत:चे अतिक्रमण वाचविण्यासाठी ही विकास कामे बंद पाडण्याचा कुटिल डाव पदाधिकाऱ्याने केला. शहरातील विकास कामे कशी चांगली होतील, दर्जा कसा राखता येईल, विकाम कामे कसे होतील, यासाठी आमदारांनी पाठिंबा द्यावा. विकास कामे अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांना पाठीशी घालू नये, असा सल्ला नगराध्यक्षा माळी यांनी दिला.

Web Title: The agitation of BJP office bearers is a gimmick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.