विजेसाठी अकलूज महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:40+5:302021-03-21T04:21:40+5:30

माळशिरस तालुक्याच्या सर्वच भागातील शेतकऱ्यांनी ज्येष्ठ भाजपा नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन विजेची समस्या सांगितली होती. यावेळी विजयसिंह ...

Agitation in front of Akluj MSEDCL office for electricity | विजेसाठी अकलूज महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

विजेसाठी अकलूज महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

Next

माळशिरस तालुक्याच्या सर्वच भागातील शेतकऱ्यांनी ज्येष्ठ भाजपा नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन विजेची समस्या सांगितली होती. यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज महावितरण व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन वीजपुरवठा सुरळीत करण्याविषयी चर्चा केली होती. थकीत असलेल्या रकमेपैकी थोडी रक्कम भरली तर वीजपुरवठा सुरळीत करु, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयाच्या दारात बैठक मारत आश्वासन देऊनही वीजपुरवठा सुरळीत का केला जात नाही, याबाबत जाब विचारला.

ठरल्याप्रमाणे आम्ही रक्कम भरावयास तयार आहोत, तरीही तुम्ही वीजपुरवठा का करत नाही, असे विचारल्यावर अधिकारी निरुत्तर झाले. बैठकीत जी रक्कम ठरली होती ती अत्यंत तोकडी असून वाढीव रक्कम भरावी लागेल ,असे म्हटल्यावर शेतकरी हैराण झाले. यावर शेतकरी प्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबरोबर पुन्हा चर्चा करण्यात आली आणि रक्कम थोडी वाढवून भरण्याचा तोडगा सामोपचाराने काढण्यात आला. सदरची रक्कम येत्या सोमवारपर्यंत भरावयाचे व उरलेली रक्कम ३० मार्चपर्यंत भरावयाचे असे ठरल्यावर शेतकरी कार्यालयातून बाहेर पडले.

यावेळी सहकारमहर्षी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, किशोरसिंह माने-पाटील, रावसाहेब पराडे, दत्तात्रय चव्हाण, तात्या आसबे, विकास कोळेकर, धनाजी चव्हाण, सतीश शेंडगे, उत्तम भोसले, किसन चव्हाण, लक्ष्मण पारसे, शंकर शेंडगे, संजय मिसाळ, अशोक चव्हाण, अनिल मुंडफने, विठ्ठल ताटे-देशमुख, विठ्ठल नलवडे, बाबासाहेब ताटे-देशमुख, विनायक पराडे, महेंद्र खिलारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणि तात्यांनी काढली कपडे

८५ वर्षे वय असणारे लक्ष्मणतात्या आसबे हे शेतकरी मोर्चात सामील होते. त्यांनी विजेअभावी होणारे शेतकऱ्यांचे हाल अधिकाऱ्यांसमोर मांडताना वैतागून आपल्या अंगावरचा शर्टच काढून टाकला. वीजपुरवठा सुरळीत करत नाही, तोपर्यंत पाणी पिणार नाही व शर्टही घालणार नाही आणि येथून उठणारही नाही, असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. अधिकाऱ्यांकडून आश्वासन घेतल्यावरचा त्यांनी अंगावर शर्ट चढवला.

७५३ कोटी रुपयांची थकबाकी

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांकडे कृषिपंपाची सुमारे ७५३ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यात अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना थकबाकी भरण्यासाठी महावितरणने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यांनी याचा लाभ घ्यावा व थकबाकी जमा करावी. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास सहाय होईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Agitation in front of Akluj MSEDCL office for electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.