सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात सांगोल्यात आंदोलन; जाणून घ्या कारण... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 11:51 AM2022-12-03T11:51:58+5:302022-12-03T11:52:15+5:30

लोकप्रतिनिधी, साबांविभाग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महूद गावातील वैतागलेल्या तरुणांनी चक्क खड्ड्यात दगड ठेवून त्याला शेंदूर फासून पुष्पहार घालून म्हसोबाच्या नावानं चांगभलं अशा घोषणा देऊन अनोखे आंदोलन केले.

Agitation in Sangola against Public Works Department; Find out why... | सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात सांगोल्यात आंदोलन; जाणून घ्या कारण... 

सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात सांगोल्यात आंदोलन; जाणून घ्या कारण... 

googlenewsNext

सांगोला : गेल्या काही दिवसांपासून महूद -सांगोला, महूद - अकलूज या दोन्हीही रहदारीच्या रोडवर ठिकाणी भले मोठे खड्डे पडून सातत्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे खड्ड्याकडे दुर्लक्ष आहे. 

वारंवार तक्रारी, लेखी निवेदन देऊनही खड्डे बुजवले जात नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात दगड रोवून त्याला शेंदूर फसला व म्हसोबाच्या नावाने चांगभलं... च्या घोषणा देत पुष्पहार अर्पण केल्याचे कैलास खबाले यांनी सांगितले. महूद (ता सांगोला) अकलूज रोडवर मध्यभागी भल्या मोठ्या पडलेल्या जीव घेणा खड्ड्याकडे लोकप्रतिनिधी, साबांविभाग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महूद गावातील वैतागलेल्या तरुणांनी चक्क खड्ड्यात दगड ठेवून त्याला शेंदूर फासून पुष्पहार घालून म्हसोबाच्या नावानं चांगभलं अशा घोषणा देऊन अनोखे आंदोलन केले.

आंदोलन प्रसंगी महूद देवस्थान कमिटीचे अध्यक्ष युवक नेते कैलास खबाले, काका नागणे- पाटील व्यापारी संचित लोखंडे, सुनील जाधव, स्वप्निल धोकटे, ईश्वरा कोळेकर नागू कांबळे, बाहूबली दोषी , बबलू बोडरे,आपा जाधव,आदी तरुण उपस्थित होते.

Web Title: Agitation in Sangola against Public Works Department; Find out why...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.