हायवेवर मॅट अंथरून, मास्क लावून केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:01+5:302021-03-13T04:41:01+5:30
दरम्यान मंडळ अधिकारी सुभाष पांढरे यांनी निवेदन स्वीकारून शुक्रवारी दुपारी तलावातील खोदाईचे जलसंधारण विभागाचे अधिकारी मोजमाप घेतील, त्याचा अहवाल ...
दरम्यान मंडळ अधिकारी सुभाष पांढरे यांनी निवेदन स्वीकारून शुक्रवारी दुपारी तलावातील खोदाईचे जलसंधारण विभागाचे अधिकारी मोजमाप घेतील, त्याचा अहवाल आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील असे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले.
कुरुल येथील पाझर तलाव क्र.१ मधून राष्ट्रीय महामार्ग कामासाठी महसूल विभागाने ६० हजार ब्रॉस मुरूम उपसा करण्यासाठी तीन मीटर खोदाईची परवानगी दिली होती, मात्र प्रत्यक्षात कंपनीने जवळपास आठ मीटर खोल आणि तब्बल दुप्पटीने मुरूम उपसा केला आहे. तो तातडीने बंद करून जेवढी खोदाई झाली, त्याचे सक्षम अधिकाऱ्यांकडून मोजमाप करून घेण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य जालिंदर लांडे, सरपंच चंद्रकला पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव यांनी निवेदनाद्वारे महसूल व पोलीस प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने दखल घेतली नसल्याने अखेर कुरुल येथे रास्ता रोको आंदोलन केले. तसेच पाझर तलाव क्र. ६ येथेही खोदाई केली असून शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतही मुरूम उपसा केला. त्याचीही चौकशी करण्यात यावी, असे लांडे यांनी सांगितले.
यावेळी आनंद जाधव, दीपक गवळी, प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच चंद्रकला पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव, टी.डी. पाटील, सुभाष माळी, माणिक पाटील, बाळासाहेब लांडे, गहिनीनाथ जाधव, आनंद जाधव, राजेंद्र लांडे, गोरखनाथ कदम, प्रमोद जाधव, समाधान गायकवाड, रोहिणी तगवाले, मोहिनी घोडके, अंजली गायकवाड, शंतनू मुलाणी, बालाजी पाटील, धनाजी चंदनशिवे उपस्थित होते. मंडळ अधिकारी सुभाष पांढरे यांनी निवेदन स्वीकारले.
शासकीय नियमानुसार केले उत्खनन
कुरुल येथील पाझर तलावातील ६० हजार ब्रॉस मुरूम उपसा करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसारच उत्खनन केलेले आहे. परंतु तलावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने संपूर्ण तलावाच्या रुंदीप्रमाणे उत्खनन करता आले नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी जास्त खोल उत्खनन झाले आहे. तेथील खड्डे भरून देण्यात येणार आहेत. यासाठी अडीच कोटी रुपये रॉयल्टी भरली आहे. मोजमापात जास्त उत्खनन झाले असल्यास नियमानुसार रॉयल्टी भरण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत जी कामे चालू आहेत, ती शासन परिपत्रकानुसार रॉयल्टी फ्री आहेत. तरीही कंपनीने या कामासाठी अगोदरच रॉयल्टी भरली आहे, असे कंपनीचे जनसंपर्क अधिकारी अभिषेक दुबे यांनी सांगितले.
फोटो
१२ कुरुल-आंदोलन
ओळी
कुरुल येथील पाझर तलावातील मुरूम उपसा बंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करताना जालिंदर लांडे, सरपंच चंद्रकला पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव आदी.