निर्णय रद्द केल्याचा आदेश मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:24 AM2021-05-20T04:24:34+5:302021-05-20T04:24:34+5:30
भीमानगर : मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इंदापूर तालुक्याला दिलेले ५ टीएमसी पाणी रद्द केल्याचे जाहीर केले. परंतु ...
भीमानगर :
मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इंदापूर तालुक्याला दिलेले ५ टीएमसी पाणी रद्द केल्याचे जाहीर केले. परंतु उजनीधरण भीमानगर येथील गेटवर बुधवारी नवव्या दिवशीही जनहित शेतकरी संधटनेचे बेमुदत धरणे कायम राहिले. आंदोलनाला बसलेले प्रभाकर देशमुख यांनी जोपर्यंत संबंधित विभागाचे जबाबदार वरिष्ठ अधिकारी येऊन लिखित स्वरूपात पत्र देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली,
दरम्यान अजूनही जिल्हातून भीमानगर याठिकाणी अनेक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे पाठिंबा ठरावाची पत्र देत आहेत.
किरणराज घाडगे-पुणे विभागीय अध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,शहराध्यक्ष स्वागत कदम, प्रहार औद्योगिक संघटनेचे अमोल जगदाळे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड,किसान युवा क्रांती प्रताप चंदनकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांनी पाठिंबा दिला.
--
सोलापूर जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतीचे ठराव देऊन पाठिंबा
जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयतचे प्रा.सुहास पाटील, विठ्ठल मस्के, सचिन पराडे-पाटील, रामदास खराडे, चिंचगाव ग्रां.प.सदस्य शंकर उबाळे, मल्हारी गवळी, प्रंशात महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासाहेब गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड,गणेश उजगीरे, सिध्दार्थ भास्कर, दत्ता आरकिले,विजयराजे खराडे,संजय नवले,श्रीराम महाडिक उपस्थित होते.