तीन कृषी कायदे रद्द झाल्यानंतरच आंदोलन थांबेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:06+5:302021-01-03T04:23:06+5:30
अखिल भारतीय किसानसभेचा तीन कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघालेल्या जत्थाचे शनिवार बार्शीत येताच ...
अखिल भारतीय किसानसभेचा तीन कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघालेल्या जत्थाचे शनिवार बार्शीत येताच मूकबधिर विद्यालय येथे त्यांचे स्वागत तानाजी ठोंबरे यांनी केले. तेव्हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर मार्गे बार्शी येथे हा जत्था दाखल झाला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दीपक आंधळकर, लक्ष्मण घाडगे, प्रवीण मस्तूद, रशिद इनामदार, दत्तात्रय कदम, अजित कांबळे, प्रा. हेमंत शिंदे, विनायक माळी, अनिरुद्ध नकाते, बालाजी शितोळे, भारत भोसले, लहू आगलावे, प्रवीण मस्तुद, शौकत शेख, सौरभ शिंदे, तानाजी जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, नाना बाराते, अविराज चांदणी आदी उपस्थित होते.
यानंतर हा जत्था बार्शीमार्गे परभणी, गंगाखेड, अकोला, अमरावती, नागपूरमार्गे दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाल्याचे प्रवीण मस्तुद यांनी सांगितले.
फोटो
०२बार्शी-शेतकरी
ओळी
दिल्लीला निघालेल्या शेतकरी संघटनेच्या जत्थाचे बार्शीत स्वागत करताना तानाजी ठोंबरे यांच्यासह शेतकरी.