इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बार्शीत ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:01 AM2021-02-20T05:01:11+5:302021-02-20T05:01:11+5:30
आम्ही सत्तेवर आल्यास पेट्रोल व गॅसचे भाव सर्वसामान्य जनतेला परवडतील असे सांगून अच्छे दिन येणार, महागाई कमी होणार अशी ...
आम्ही सत्तेवर आल्यास पेट्रोल व गॅसचे भाव सर्वसामान्य जनतेला परवडतील असे सांगून अच्छे दिन येणार, महागाई कमी होणार अशी आश्वासने देत लोकांच्या भावनेशी खेळत सत्ता काबीज केली. त्यानंतर जनतेच्या पाठीत रोजगार, महागाई पेट्रोल भाववाढ गॅस दर भाववाढ याचा खंजीर खुपसला. उद्योगधार्जिण निर्णय घेणाऱ्या व सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्याला आर्थिक संकटात ढकणाऱ्या भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले, सोलापूरचे नगरसेवक विनोद भोसले, जिल्हाध्यक्ष नितीन नागणे, शहराध्यक्ष ॲड. जीवन आरगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल मस्के, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, दत्ताजी गाढवे, तानाजी जगदाळे, ॲड. निवेदिता आरगडे, सेवादल यंग ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ. विजय साळुंके, शहर उपाध्यक्ष नीलेश मांजरे-पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष केशव मुकटे, ओमप्रसाद अनपट, बबलू शेट्टी, शिवा माने, सोनू नवगण, अमोल नवगण आदी उपस्थित होते.
फोटो
१८बार्शी-आंदोलन
ओळी
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ग्राहकांना गुलाबपुष्प देत आंदोलन करताना युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.