शिवपुरीच्या वतीने सोलापूरसह जगभरात अग्निहोत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:40 AM2021-03-13T04:40:39+5:302021-03-13T04:40:39+5:30
अक्कलकोट : यंदा कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सोलापूरसह जगभर यंदा सामुदायिक अग्निहोत्र साजरा करण्याचे नियोजन शिवपुरी संस्थेने केले आहे. ऑस्टिया, ...
अक्कलकोट : यंदा कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सोलापूरसह जगभर यंदा सामुदायिक अग्निहोत्र साजरा करण्याचे नियोजन शिवपुरी संस्थेने केले आहे. ऑस्टिया, जर्मनी, कॅनडा, स्पेन, चीन, मलेशिया, अमेरिका आणि भारतातील कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र, पुणे, जळगाव, सोलापूर, देहू, तळेगाव, रत्नागिरी, चिपळूण आदी ठिकाणी १२ मार्च रोजी अग्निहोत्र होत आहे.
अग्निहोत्र यज्ञाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहावे. या माध्यमातून पर्यावरण पूरक शास्त्रीय प्रयोग होत आहेत. अग्निहोत्राचे उपाय असून ज्ञान, वान, तप, कर्म, स्वाध्याय या पंचसाधन कर्माच्या सिद्धांतावर हे विकसित करण्यात आले आहे. १२ मार्च रोजी सामूहिक स्वच्छता, अग्निहोत्र करण्यात येणार आहे. काही ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. संध्याकाळी ७ वाजता अग्निहोत्र फेसबुक लाईव्ह होणार आहे.
शिवपुरीत विध्याचे देवता असलेल्या गणेश याग तेथील शाळेत करण्यात येणार आहे. यासाठी औदुंबर, पिंपळ, वड, वाळलेल्या समिधा, गायीचे तूप, तांदूळ याचे वापर करून अग्निहोत्र करण्यात येणार आहे. माहिती शिवपुरी संस्थानेच अध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम राजीमवले यांनी दिले.
--
अग्निहोत्राने वातावरण होते शुद्ध
दररोज अग्निहोत्र केल्याने घरातील वातावरण शुद्ध ,पवित्र राहते. ते सुगंधी पुष्टीतत्वाने भारले जाते. सूर्योदयाच्या अग्निहोत्राचा इष्ट परिणाम सूर्यास्तापर्यंत व सूर्यास्ताचा इष्ट परिणाम सूर्योदयापर्यत टिकून राहतो. याद्वारे अग्निहोत्रास्थानी स्वास्थ्य व कल्याणकारी चक्र कार्यरत राहते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून स्वास्थ्य लाभते. वातावरणात रोगाणूच्या वाढीस प्रतिबंध होतो. व्यसनमुक्त,चिडचिडा, हटटी व मतिमंद मुलांवर हे फारच उपयुक्त ठरते. अग्निहोत्र आचाराने घ्यान, धारणा, योग, जप आदी कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक साधना लाभते.
---
म्हणून अग्निहोत्र दिवस पाळला जातो
तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांनी मंदिरातील वटवृक्षाखाली २२ वर्ष वास्तव्य केले. त्यांच्याच आज्ञेने बाळप्पा महाराजांनी गुरू मंदिराची स्थापना केली. त्यांच्या नंतर १९१० साली सद्गुरू गंगाधर महाराज यांनी १९३८ मध्ये गजानन महाराज हे उत्तराधिकारी बनले. ते २० वर्षाचे होते. त्यांनी या पिठावरून ५० वर्षे वेदपीठाचे कार्य केले. त्यानंतर महाराजांनी शिवपुरी संचलित गुरुमंदिर येथे १२ मार्च १९४४ मध्ये वेदांतील अंग असणाऱ्या अग्निहोत्रामुळे वायुमंडलाचे शुद्धीकरण होते. अल्पावधीतच जागतिक मान्यता मिळाली. म्हणून १२ मार्च हा दिवस जागतिक अग्निहोत्र दिन म्हणून ओळखले जाते.
----
११ डॉ. राजीमवाले
शिवपुरीचे संस्थानचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले अग्निहोत्र करताना दिसत आहेत.