कृषी वार्ता; यंदाच्या खरीप पेरणीला सर्जाराजाऐवजी ट्रॅक्टरलाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 08:17 AM2021-06-12T08:17:04+5:302021-06-12T08:17:29+5:30

चपळगाव मंडलात मोठ्या प्रमाणावर होणार खरीपाची पेरणी!

Agricultural news; This year's kharif sowing prefers tractors instead of sarjaraja | कृषी वार्ता; यंदाच्या खरीप पेरणीला सर्जाराजाऐवजी ट्रॅक्टरलाच पसंती

कृषी वार्ता; यंदाच्या खरीप पेरणीला सर्जाराजाऐवजी ट्रॅक्टरलाच पसंती

googlenewsNext

चपळगाव -  शंभूलिंग अकतनाळ

भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. याच देशात बैलजोड्यांच्या साहाय्याने शेती करणारा शेतकरी वर्ग मोठा आहे. बैलांच्या साहाय्याने शेतातील अनेक कामे पार पडतात.मात्र आधूनिक युगात क्रांतीकारक बदल झाल्याने याच बैलजोड्यांना फाटा देत ट्रॅक्टरने पेरणी करण्याची पध्दत रूढ झाली आहे. यंदाच्या वर्षी चपळगाव मंडलातील बहुतांश शेतकऱ्यांनी सर्जाराजाच्या जोडीला फाटा देऊन ट्रॅक्टरच्या माध्यमातुन खरीपाची पेरणी करत असल्याचे  दिसत आहे.


चपळगाव मंडलातील दहिटणे, चपळगाव, चपळगाववाडी, दहिटणेवाडी, हन्नुर, डोंबरजवळगे, बोरेगाव, बावकरवाडी, चुंगी, दर्शनाळ, सिंदखेड, मोट्याळ, नन्हेगाव, बऱ्हाणपूर आदी गावातील शेतकरी प्रामुख्याने तुर, उडीद, मुग, सोयाबीन, सुर्यफूल, भुईमुग, मका आदी खरीप पिके घेतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज भासते.मात्र सद्यस्थितीत प्रत्येक गावात बैलांची संख्या बोटावर मोजण्याइतपच शिल्लक असल्याने खरीपाची पेरणी वेळेवर कशी करता येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते.मृग नक्षत्रातील पावसाच्या हजेरीनंतर खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकरी लगबग करतात.म्हणून यंदाच्या वर्षी बैलजोड्यांना फाटा देत ट्रॅक्टरच्या माध्यमातुन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.


चपळगाव मंडलातील जवळपास २१००० हेक्टर क्षेत्रापैकी  जवळपास ७५ टक्के क्षेत्रावर शेतकरी खरीप पिकांची पेरणी करण्याचा अंदाज आहे. यामध्ये उडीद पिकाला बहुतांश शेतकर्‍यांनी पसंती दिली असली तरी मुग,तुर,सूर्यफूल, भुईमूग,सोयाबीन,साळी, पिकांचीदेखील पेरणी मोठ्या प्रमाणात होत आहे.


बैलजोड्यांऐवजी ट्रॅक्टरलाच का पसंती?

खरीप हंगामावर शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षाचे अर्थकारण अवलंबून असते.यासाठी खरीपातील प्रत्येक पाऊस आणि प्रत्येक दिवस लाखमोलाचा ठरतो.ही बाब लक्षात घेता प्रत्येक शेतकरी खरीप हंगामाची पेरणी वेळेवर करतात.सद्यस्थितीत एका बैलजोडीला प्रतिदिवस १५०० रूपये भाडे मोजावे लागतात.तसेच खते,बियाणेंचा व मजुरांचा खर्च जोडता पेरणीसाठी प्रतिदिन शेतकरी जवळपास ५००० रूपये मोजतो.यामध्ये जवळपास तीन ते चार एकरवर पेरणी होते.याउलट सद्यस्थितीत ट्रॅक्टरला प्रतिएकर ८०० ते ९०० रूपये भाडे द्यावे लागते.ट्रॅक्टरवर एका दिवसात किमान दहा एकरावर पेरणी करणे शक्य होते.ट्रॅक्टरच्या माध्यमातुन बियाणे,खत एकाच वेळी सोडता येते.तसेच बारीक उठलेले तणदेखील मोडले जाते.बैलजोड्यांवर पेरणीसाठी, रासणीसाठी,खत सोडण्यासाठी मजुरांची गरज भासते.या बाबी लक्षात घेता मजुरीचा खर्च,वेळेची बचत,कमी कालावधीत जास्तीचे काम करण्यासाठी ट्रॅक्टर उपयूक्त ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

बैलजोड्यांवर तीन दिवसांपर्यंत  होणारे काम ट्रॅक्टरने एक-दीड दिवसात पूर्ण होते.शिवाय मजुरीचा खर्च,वेळेची होणारी बचत या बाबी शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी हिताच्या ठरतात.यासाठी मी ट्रॅक्टरने पेरणी केली आहे.

- चिदानंद माळगे(सरपंच,डोंबरजवळगे)

Web Title: Agricultural news; This year's kharif sowing prefers tractors instead of sarjaraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.