ॲग्रोटेकचा बोर्ड लावून थाटले अवैध दारू विक्रीचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:22 AM2021-05-10T04:22:16+5:302021-05-10T04:22:16+5:30

पंढरपूर तालुक्यातील सोनके गावच्या वेशीवरील सुरूची ढाबा येथे हा दारू अड्डा सुरू होता. लॉकडाऊनमध्ये ढाबा बंद करण्याच्या सूचना आल्याने, ...

Agrotech's board was set up to sell illegal liquor | ॲग्रोटेकचा बोर्ड लावून थाटले अवैध दारू विक्रीचे दुकान

ॲग्रोटेकचा बोर्ड लावून थाटले अवैध दारू विक्रीचे दुकान

Next

पंढरपूर तालुक्यातील सोनके गावच्या वेशीवरील सुरूची ढाबा येथे हा दारू अड्डा सुरू होता. लॉकडाऊनमध्ये ढाबा बंद करण्याच्या सूचना आल्याने, ढाबा चालक लिंगाप्पा कोळेकर याने आपल्या हॉटेल कम ढाब्याच्या दुकानावर ‘जय मल्हार ॲग्रोटेक’ नावाचा बोर्ड लावून या दुकानात शेती औषधे व खत विक्री केली जात असल्याचा भास निर्माण केला.

अवैध दारू विक्रीची तालुक्यात कडक अंमलबजावणी होत असताना कोळेकरने नामी युक्ती शोधून आपली दारू विक्री खुलेपणाने सुरू ठेवली होती. या दुकानाकडे पाहताक्षणी औषधी दुकान असल्याचा भास होत होता. मात्र या औषध दुकानातील बॉक्समध्ये विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या ठेवलेल्या पोलिसांना आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी २५०० रुपयांची दारू जप्त केली.

ही कारवाई पंढरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस शिपाई विलास घाडगे, हुलजंती, विशाल भोसले यांनी केली.

फोटाे ::::::::::::::

शेती औषधे विक्रीच्या दुकानात सापडलेल्या अवैध दारूच्या बाटल्या.

Web Title: Agrotech's board was set up to sell illegal liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.