अहिल्यादेवी होळकरांचा लोककल्याणकारी इतिहास जगासमोर यावा - डॉ. उमेश कदम

By संताजी शिंदे | Published: May 31, 2024 07:38 PM2024-05-31T19:38:51+5:302024-05-31T19:39:34+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर होते.

Ahilya Devi Holkar's public welfare history should come before the world says Dr. Umesh Kadam | अहिल्यादेवी होळकरांचा लोककल्याणकारी इतिहास जगासमोर यावा - डॉ. उमेश कदम

अहिल्यादेवी होळकरांचा लोककल्याणकारी इतिहास जगासमोर यावा - डॉ. उमेश कदम

सोलापूर : मध्ययुगीन इतिहास काळात एक उच्च कोटीच्या प्रशासक राहिलेल्या रणरागिणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी महान कार्य करत आदर्श राज्यकारभार सांभाळला. त्यांची प्रसिद्ध युद्धनीती, आदर्श न्यायदान पद्धत, प्रजेबद्दल राहिलेली आस्था, मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार त्याचबरोबर त्यांनी केलेल्या महान कार्याचा इतिहास जगासमोर यावा, अशी अपेक्षा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील वरिष्ठ इतिहास प्राध्यापक डॉ. उमेश कदम यांनी व्यक्त केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात, अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. कदम हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करत मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यावार्ता अंकाचे तसेच चिन्मयी मुळे लिखित क्वीन ऑफ इंडोमिटॅबल स्पिरिट या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याचबरोबर यावेळी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेली स्वाती राठोड, जागतिक पातळीवर कराटे स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेली भुवनेश्वरी जाधव आणि राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक स्पर्धेत यश संपादन केलेली तेजस्विनी केंद्रे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. बक्षिसाचे अभिवाचन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती माशाळे व डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. काळवणे यांनी मानले.

Web Title: Ahilya Devi Holkar's public welfare history should come before the world says Dr. Umesh Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.