काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली; भाकितासाठी ज्योतिषी कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 05:14 AM2019-09-02T05:14:03+5:302019-09-02T05:14:07+5:30

मुख्यमंत्री; थोरातांनीच आरशात पाहावे, आम्ही जनतेच्या चेहऱ्यात पाहतो

The air of Congress-NCP is gone; Why an astrologer for prophecy? | काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली; भाकितासाठी ज्योतिषी कशाला?

काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली; भाकितासाठी ज्योतिषी कशाला?

Next

लातूर : काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांनाही आरशात पाहण्याचा उलट सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिला.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने लातुरात रविवारी सकाळी विश्रामगृहावर पत्रपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्या टीकेला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री काय ज्योतिषी आहेत काय? मी त्यांना सांगू इच्छितो तुमची हवा संपली आहे, हे भाकित करायला ज्योतिषाची गरज नाही. शिवाय, मला आरशात पाहण्याची गरज नाही. आम्ही जनतेच्या चेहºयात पाहतो. त्यामुळे आरशात पाहण्याची वेळ कोणावर आली आहे हे थोरातांनी समजून घेण्याची गरज आहे.

८३ मतदारसंघात यात्रा...
दुसºया टप्प्याच्या यात्रेचा सोलापुरात समारोप होत असून, २ हजार ४४३ किलोमीटरचा प्रवास आणि ८३ मतदारसंघ पूर्ण झाले आहेत. त्यात मराठवाड्याने भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या भागाच्या दुष्काळमुक्तीवर भर राहील. जलआराखडा तयार आहे. ६४ हजार किलोमीटरची पाईपलाईन जोडून वॉटर ग्रीड साकारले जाईल. लातूर -उस्मानाबादच्याही निविदा निघतील. तसेच लातूरला उजनीचे पाणी देणार, असेही ते म्हणाले.

मराठवाड्याला हक्काचे १०२ टीएमसी पाणी मिळणार
मराठवाड्याच्या हक्काचे १०२ टीएमसी पाणी आहे. परंतु, ८० टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरु शकत नाही. ते वाहून जाते. त्यामुळे हक्काचे १०२ टीएमसी पाणी वापरण्यासाठी कोणत्याही प्राधिकरणाकडे जाण्याची गरज नाही. त्याच अर्थाने धरणे, प्रकल्प उभारण्यावरही बंधन राहणार नाही, असे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले.

मेगा भरती नाही; निवडक भरती
जागावाटप पाहूनच निवडकांना प्रवेश दिला जात आहे. आमच्याकडे मेगा भरती नाही परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीत मेगा गळती नक्कीच आहे. इनकमिंगमुळे मूळ भाजपावर अन्याय होईल काय, या प्रश्नावर ते म्हणाले ९८ टक्के मूळ भाजपाच आहे. २ टक्केसुद्घा नवीन नाहीत.

Web Title: The air of Congress-NCP is gone; Why an astrologer for prophecy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.