युरोपातून स्थलांतर झालेल्या गुलाबी मैनांची उजनी धरण काठावर हवाई सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:17 PM2021-02-09T13:17:31+5:302021-02-09T13:17:46+5:30

ज्वारी, द्राक्षवर मारतात डल्ला

Air travel on the banks of the Ujani Dam of the Pink Manas migrated from Europe | युरोपातून स्थलांतर झालेल्या गुलाबी मैनांची उजनी धरण काठावर हवाई सफर

युरोपातून स्थलांतर झालेल्या गुलाबी मैनांची उजनी धरण काठावर हवाई सफर

Next

करमाळा : गुलाबी मैना व भोरड्या या नावाने परिचित असलेल्या युरोपातून स्थलांतर होऊन उजनी धरण परिसरात दाखल झाल्या आहेत. त्या ज्वारी व द्राक्ष पिकांवर डल्ला मारून उजनी धरण परिसरात हवाई सफर करताना दिसत आहेत.

करमाळा तालुक्यातील पारेवाडी, कोर्टी, आळसुंदे, हिंगणी व केत्तूर परिसरातील पणस्थळावरच्या काठावरील झाडाझुडुपांमध्ये लाखांच्या संख्येने या सध्या मुक्कामाला आहेत. इंग्रजीमध्ये रोझी पॅस्टर व स्टर्लिंग या नावाने ओळखले जाणारे हे पक्षी युरोपातील हिवाळ्यात जाणवणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करून घेण्यासाठी भारतात येतात. विशेष करून महाराष्ट्रातील ज्वारी पिकणाऱ्या प्रदेशात बहुसंख्येने त्या येतात.

जिल्ह्यातील कोरडवाहू पिकांकडून बागायतीकडे वळले आहेत. परिणामी ज्वारीचे क्षेत्र कमी होताना दिसत आहे. त्यामुळे त्या भोरड्याही आता आपल्या खाद्य सवयीत बदल करीत सध्या ते द्राक्ष, पपई, अंजीर, डाळिंब यासारख्या फळपिकांवर उपजीविका करीत आहेत. हे पक्षी अमाप संख्येनी उभ्या पिकांवर डल्ला मारत असल्याने ते शेतक-यांना उपद्रवी ठरतात. ज्वारीची सुगी संपल्यानंतर म्हणजे एप्रिलमध्ये हे पक्षी आपल्या मायदेशी परततात.

करमाळा तालुक्यातील विविध पाणस्थळाजवळ असलेल्या झाडांवर हे पक्षी दररोज मुक्कामाला येतात. दिवसभर उदरनिर्वाहासाठी हजारोंचा थवा करून पंचक्रोशीत हे पक्षी विखरून जातात व सायंकाळच्या वेळी मुक्कामासाठी अनेक थवे एकत्र येतात.

असा आहे पक्ष्यांचा दिनक्रम

या पक्ष्यांतील वैशिष्ट्य म्हणजे झाडावर आसनस्थ होण्यापूर्वी हजारांच्या संख्येत ठरलेल्या वेळेतच एकत्र येऊन हवाई कसरत करतात. हे विलोभनीय दृश्य सर्वांना थक्क करून सोडते. सुमारे पंधरा मिनिटांच्या कसरतीनंतर झाडावर विसावून दहा मिनिटे एकच कलकलाट करीत आपसात संवाद साधतात. अंधार दाटून आला की एकदम चिडीचूप होऊन झोपी जातात. सूर्योदयाबरोबर हे पुन्हा सुमारे दहा-बारा मिनिटे हवेत घोंगावत सर्वांचे लक्ष वेधून घेतात. नंतर सर्व दिशेने विखरून जातात.

 

एकेकाळी ज्वारीला प्राधान्य देणारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता सिंचनाचा अवलंब करीत नगदी पिकाकडे वळला आहे. आता ज्वारीचे क्षेत्र घटत असतानासुद्धा भोरड्या मात्र इकडे नित्यनियमाने येतातच. भोरड्या या परदेशी पक्ष्यांच्या वावराने जिल्ह्यात पक्षी वैभव टिकून राहिले आहे.

- डॉ. अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक.

Web Title: Air travel on the banks of the Ujani Dam of the Pink Manas migrated from Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.