चुलीवर पदर पडल्यानं आजीबाई भाजल्या, उपचार सुरू
By विलास जळकोटकर | Published: April 17, 2023 05:49 PM2023-04-17T17:49:02+5:302023-04-17T17:49:27+5:30
करमाळा तालुक्यातील निंबोरी येथील घटना
विलास जळकोटकर, सोलापूर: काम करीत असताना अचानक चुकून चुलीवर पदर पडल्याने ७० वर्षाच्या आजीबाई भाजल्या. करमाळा तालुक्यातील निंबोरी येथे ही घटना घडली. त्यांच्यावर रविवारी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गुणाबाई काशिनाथ खराडे (वय- ७०) असे भाजलेल्या आजीबाईचं नाव आहे.
सत्तर वर्षीय आजी गुणाबाई खराडे या निंबोरे (ता. करमाळा) येथे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. घरातील चुलीसमोरुन जाताना चुकून त्यांचा पदर पेटत्या चुलीवर पडल्याने त्या भाजल्या. नातलगांनी धावाधाव करुन पेटलेला पदर विझवला. त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. उन्हाळ्यामुळे भाजलल्या त्वचेला दाह होऊन अधिक त्रास जाणवू लागल्याने शनिवारी करमाळ्यातील सरकारी दवाखान्यात नेऊन उपचार केले. तेथे डॉक्टरांनी सोलापूरला जाण्याचा सल्ला दिल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरु आहेत.