मागासवर्गीय अधिकाऱ्यांचे करिअर संपवण्याचे काम अजित पवारांनी केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:09+5:302021-06-16T04:30:09+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन पडळकरांनी ओबीसी समाजाच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात घोंगडी बैठका घेण्यास पंढरपुरातून सुरुवात केलीय. ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन पडळकरांनी ओबीसी समाजाच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात घोंगडी बैठका घेण्यास पंढरपुरातून सुरुवात केलीय. यावेळी भाजप किसान मोर्चाचे चिटणीस माउली हळणवर, दत्ता गुरव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
पडळकर म्हणाले, मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीमधील आरक्षण असो, की ओबीसी वर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण, ते रद्द होण्याला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे. आपण पक्ष, राजकारणविरहित घोंगडी बैठका घेत आहोत. यामाध्यमातून अठरापगड जातीचे प्रश्न घेऊन त्यांच्यासाठी भविष्यात लढा उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी पंढरपूर शहरातील २१ समाजाच्या बैठका घेऊन आमदार पडळकरांनी त्या समाजातील प्रश्न जाणून घेतले. त्यावर चर्चा करण्यात आली.
कॉंग्रेसचे काका-पुतण्यासमोर चालत नाही
काँग्रेसचे पवार काका-पुतण्यासमोर काहीच चालत नाही. त्यांच्या वाट्याला जे काही येईल तेवढे घ्यायचे एवढा उद्योग सध्या सुरू आहे. पदोन्नतीच्या आरक्षणाचा कायदा रद्द न झाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे ऊर्जामंत्री गप्प का आहेत? त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही पडळकरांनी केली.
----
फोटो : ओबीसी समाजाच्या घोंगडी बैठकांना सुरुवात करण्यापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन जाताना आमदार गोपीचंद पडळकर. सोबत भाजप किसान मोर्चाचे चिटणीस माउली हळणवर व अन्य पदाधिकारी.
----
फोटो : तेली समाजातील बांधवांशी चर्चा करताना आ. गोपीचंद पडळकर, भाजप किसान मोर्चाचे चिटणीस माउली हळणवर व अन्य पदाधिकारी.