वडिलांचा सांभाळ न करणाºया अक्कलकोट येथील दोघांवर गुन्हा दाखल, बँकेच्या अधिकाºयांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:30 PM2017-12-27T12:30:06+5:302017-12-27T12:33:42+5:30
अक्कलकोट येथील वडिलांचे पालनपोषण न करणाºया एक बँक अधिकारी मुलगा तर दुसºया एका कंपनीत अधिकारी असलेल्या अशा दोन कुपुत्रांवर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
अक्कलकोट दि २७ : अक्कलकोट येथील वडिलांचे पालनपोषण न करणाºया एक बँक अधिकारी मुलगा तर दुसºया एका कंपनीत अधिकारी असलेल्या अशा दोन कुपुत्रांवर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. असा गुन्हा दाखल होण्याची घटना देशात पहिलीच असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत.
याबाबत शिवय्या विरय्या स्वामी (वय ७५, रा. अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी श्रीशैल शिवय्या स्वामी व चंद्रकांत शिवय्या स्वामी ही दोन्ही मुले वडिलांना सांभाळत नाहीत. १५ वर्षांपूर्वी फिर्यादीच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर आरोपींनी स्वत:चे घर दुसºयास भाड्याने देऊन वडिलांना घराबाहेर काढले. त्यामुळे फिर्यादीच्या पालन-पोषणाचा प्रश्न निर्माण झाला. फिर्यादी अनेक दिवसांपासून मुलांना सुधारण्याची संधी दिली. मात्र त्यांना वडिलांना सांभाळण्याची सद्बुद्धी आली नाही. जन्म देऊन जग दाखविलेल्या कुपुत्रांवर तक्रार देण्यासाठी चक्क पित्याला पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली. पोलिसांनी पित्याची व्यथा ऐकून हळहळले. पण मुलांच्या हृदयाला काही पाझर फुटला नाही. दरम्यान, याबाबत चौकशी करून पोलिसांनी पालन-पोषण व कल्याण अधिनियम २००७ क्र. २४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पो. नि. सूरज बंडगर करीत आहेत.