अक्कलकोट येथे एकाच दिवशी १५ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:04+5:302021-04-08T04:23:04+5:30
दोन दिवसांपासून अक्कलकोट शहरात तालुक्यात युद्धपातळीवर कोरोना चाचणी केली जात आहे. यामुळे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. ...
दोन दिवसांपासून अक्कलकोट शहरात तालुक्यात युद्धपातळीवर कोरोना चाचणी केली जात आहे. यामुळे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. बुधवारी अक्कलकोट येथील नगरपालिकेच्या पथकाने एस.टी. स्टॅण्ड येथे तपासणी कॅम्प आयोजित केला होता. त्याप्रसंगी तेथील फळविक्रेते, किराणा दुकानदार, बेकरी आदी क्षेत्रांतील लोकांची ॲण्टिजेन टेस्ट केली. यात नऊ जण पॉझिटिव्ह आढळले. तसेच ग्रामीण भागातही आरोग्य विभागातील टीम जोमाने तपासणी करीत आहेत. त्यामध्ये चुंगी-१, मैंदर्गी-१, कोळेकरवाडी-१ सुलेजवळगे-१, समर्थनगर-१, रामपूर ता. दक्षिण सोलापूर असे तब्बल १५ पॉझिटिव्ह रुग्ण एका दिवशी आढळून आले. तपासणीसंख्या वाढत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण उघडकीस येत आहेत. यापूर्वी अनेक दिवस प्रशासनाकडून सक्तीने तपासणी केली जात नव्हती. म्हणून, रुग्ण सापडत नव्हते.
याकामी डॉ. अशोक राठोड, डॉ अश्विन करजखेडे, विस्तार अधिकारी महेश भोरे, अक्कलकोट न.प.चे मुख्याधिकारी सचिन पाटील, विठ्ठल तेली, मलिक बागवान, भागवत सांगोलकर, नवनाथ शिंदे परिश्रम घेत आहेत.
---