अक्कलकोट-गाणगापूर रस्ता खचला; ठिगळ मारण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:17+5:302021-06-09T04:28:17+5:30
अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट-गाणगापूर या ३७ किलोमीटर सिमेंट रस्त्याचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. तांत्रिक अडचणीमुळे केवळ चार ...
अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट-गाणगापूर या ३७ किलोमीटर सिमेंट रस्त्याचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. तांत्रिक अडचणीमुळे केवळ चार किलोमीटर रस्ता होणे बाकी आहे. मात्र रस्ता पूर्ण होण्याआधीच रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. ठेकेदारांकडून ते बुजविण्याचे काम सुरू आहे.
अक्कलकोट - गाणगापूर (क्रमांक १५०) हा राष्ट्रीय महामार्ग भक्तांमुळे नेहमी गजबजलेले असतो. या मार्गावर वाढलेली वाहतूक पाहता शासनाने चारपदरी रस्ता बांधणीला सुरुवात केली. ३७ किलोमीटर अंतराच्या सिमेंट रस्त्यासाठी १३२ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामधून जवळपास ११० कोटी रुपये खर्च झाले आहेत. केवळ चार किलोमीटर रस्ता भूसंपादन पूर्ण झाले नाही. यासाठी प्रलंबित राहिलेले आहे.
रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सन-२०१७-१८ मध्ये सुरुवात झाली आहे. काम रेंगाळत राहिल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुढे रस्ता पूर्ण होत असताना पाठीमागून रस्ता खराब होत आहे. पूर्ण होण्याआधीच मोठमोठ्या भेगा पडत आहेत. अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
--
अक्कलकोट - गाणगापूर प्रवास पूर्ण करण्यासाठी पूर्वी पाच तास लागत होते. आता केवळ तीन तास लागत आहे. हे जरी खरे असले तरी सिंनूर, संगोगी ब.,रुद्देवाडी, दुधनी, बिंजगेर, मैंदर्गी, मिरजगी, उमरगे, रामपूर अशा विविध गावांच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. रस्ता खचल्याने वाहने एका बाजूला धावतात अन् अपघात होताहेत. त्यामध्ये ठेकेदारांकडून केमिलक टाकून भेगा बुजविल्या जात आहेत.
---
अक्कलकोट-गाणगापूर राष्ट्रीय महामार्ग ९० टक्के पूर्ण झाला आहे. केवळ ४ टक्के काम भूसंपादनाअभावी राहिले आहे. याबाबत सोलापूर येथे नुकतीच बैठक झाली. भूसंपादनासाठी लागणारा निधी केंद्रीय मंत्र्यांकडून आणू अशी ग्वाही आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी ग्वाही दिली आहे. त्यामुळे लवकरच काम पूर्ण करू.
- एम. आर. राठोड, शाखा अभियंता
----
फोटो : ०८ अक्कलकोट १
अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावरील रामपूर गावाजवळ सिमेंट रस्त्यावर पडलेल्या भेगा ठेकेदाराकडून बुजविण्यात येत आहेत.