अक्कलकोट, पंढरपूर अन् सिद्धेश्वर मंदिर बनले बेघर मुलांचे हॉटस्पॉट
By बाळकृष्ण दोड्डी | Published: October 25, 2023 04:49 PM2023-10-25T16:49:55+5:302023-10-25T16:50:56+5:30
बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी जिल्ह्यातील ६९ बेघर बालकांचे पुर्नवसन केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
सोलापूर : रस्त्यावर भटकणाऱ्या ६९ मुलांचा शोध घेऊन बाल संरक्षण विभागाने मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. पंढरपूर, अक्कलकोट तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसरत बेघर मुलांसाठी हॉटस्पॉट बनल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बाल संरक्षणासाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बालकांच्या पुर्नवसन कामांचा आढावा घेतला. या वेळी बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी जिल्ह्यातील ६९ बेघर बालकांचे पुर्नवसन केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
या बैठकीला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले, बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद, बालकल्याण समितीचे सदस्य ॲड. सुवर्णा कोकरे, विजय फुटाणे, नीता गुंड, शहर पोलीस उपायुक्त अशोक तोरडमल, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते.