अक्कलकोटच्या व्यापा-याने हुरड्यातून जपला जिव्हाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:03 AM2021-02-20T05:03:06+5:302021-02-20T05:03:06+5:30
येथील व्यापारी प्रमोद पाटील यांच्या कुटुंबानी मागील तीन पिढ्यांपासून विविध क्षेत्रातील व्यक्तींना हुरडा खाऊ घालण्याचे काम निरंतर ठेवले आहेत. ...
येथील व्यापारी प्रमोद पाटील यांच्या कुटुंबानी मागील तीन पिढ्यांपासून विविध क्षेत्रातील व्यक्तींना हुरडा खाऊ घालण्याचे काम निरंतर ठेवले आहेत. सुरवातीला दिवंगत पाटील यांनी व्यापारी, पाहुणे-रावळे यांना दरवर्षी हुरडा खाऊ घालत होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव दिवंगत प्रकाश पाटील, सुरेश पाटील यांनी या उपक्रमात काही प्रमाणात वाढ केली. त्यानंतर प्रमोद पाटील यांच्या रूपाने तिस-या पिढीने त्यात वाढ करीत आजही ही परंपरा कायम ठेवली आहे. २००८ पासून प्रमोद पाटील यांनी व्यापारी, पाहुणे-रावळे, मित्रमंडळीसह डॉक्टर, वकील, पत्रकार, पोलीस, शिक्षक, महसूल, बँक कर्मचारी क्षेत्रातील लोकांना दरवर्षी हुरडा खाऊ घालण्याचा उपक्रम नित्याने सुरू ठेवला आहेत. त्यांना त्याचे भाहुजी शिवराज बिराजदार यांची साथ मिळत आहे. पाटील यांचे एकूण ४२ एकर क्षेत्र असून त्यापैकी ५ एकर क्षेत्रावर विविध प्रकारची हुरडा शेती करतात. दरवर्षी २६ जानेवारी रोजी हुरडा उपक्रमास प्रारंभ करतात. त्यानंतर ५० ते ६० दिवस हा उपक्रम चालतो. आठवडाभरात ३०० ते ४०० लोकाना खाऊ घालतात. शनिवारी, रविवारी यात वाढ होते. आजच्या धकाधक्कीच्या जीवनात दोन महिने सतत असा हा उपक्रम सुरू असतो.
महाराष्ट्रासह कर्नाटकात वाढताेय मित्रपरिवार
पाटील कुटुंबानी मागील १२ वर्षांपासून हा उपक्रम सुरू ठेवला असून तो आजही अविरतपणे सुरूच आहे. दरवर्षी १० ते १२ हजार लोकांना हुरडा खाऊ घालतात. अक्कलकोटसह, सोलापूर, पुणे, मुंबई आणि कर्नाटकातील विजयपूर, इंडी, आळंद, अफझलपूर, कलबुर्गी या ठिकाणाहून नातेवाईक, मित्रमंडळी याचा आस्वाद घेतात. नारीबाल, कुचकुची, गुळभेंडी, श्रुती आशा विविध प्रकारचा हुरडा त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
कोट ::::::::::::::
आजोबा दिवंगत शामराव पाटील यांनी हा उपक्रम सुरु केला. त्यामध्ये माझे वडील प्रकाश पाटील व मी त्यात वाढ करून २००८ पासून सध्या दरवर्षी १० ते १२ हजार विविध क्षेत्रातील लोक विविध प्रकारचे हुरड्याचे आस्वाद घेत असतात. यातून संपर्क वाढून स्नेहभाव निर्माण होतो. हुरडा खाऊ घातल्याने आम्हा संपूर्ण कुटुंबाला मानसिक समाधान मिळते.
-प्रमोद पाटील, आयोजक
फोटो
१९अक्कलकोट-हुरडा
ओळी
अक्कलकोट येथील प्रमोद पाटील यांच्या शेतात विविध क्षेत्रातील लोक विविध प्रकारच्या हुरड्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत.