अकलूज बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:11+5:302021-06-09T04:28:11+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिलमध्ये प्रारंभी सप्ताह समाप्तीस शनिवार, रविवार लॉकडाऊन जाहीर केला. तद्नंतर अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहीर केला. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिलमध्ये प्रारंभी सप्ताह समाप्तीस शनिवार, रविवार लॉकडाऊन जाहीर केला. तद्नंतर अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहीर केला. त्यानुसार अत्यावश्यक व किराणा, दूध, भाजीपाला वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले. त्यानंतर अत्यावश्यक सेवांचाही वेळ कमी करून सकाळी ७ ते ११ पर्यंत मर्यादित वेळ करण्यात आली. तरीही कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली होती. अकलूजमधील सर्व व्यवहार बंद केले होते. तरीही काही प्रमाणात रस्त्यावरून वाहतूक सुरू होती.
लॉकडाऊन काळात अकलूज शहरातील सर्व मुख्य रस्ते व चौकातून नाकाबंदी केली होती. त्यानंतर शासनाने १५ जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. परंतु रुग्णसंख्या घटल्याने शासनाने कडक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात आजपासून (सोमवार) सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत अत्यावश्यक सेवांबरोबरच इतर व्यवसाय सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले. त्यानुुसार आज अकलूज शहरातील व्यावसायिकांनी बंद असलेली दुकाने साफसफाई करत दैनंदिन व्यवहार सुरू केले. यामुळे ग्राहकांची विविध वस्तू खरेदीसाठी बाजारपेोत वर्दळ सुरू झाल्याने शहरातील रस्ते गजबजले होते.