अकलूज पोलिसांनी ५ किलो गांजासह १ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:55+5:302021-06-25T04:16:55+5:30
खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सापळा रचून अकलूज- इंदापूर रस्त्यावरील अकलूज हद्दीतील तांबोळी वसाहतीकडे जाणाऱ्या ...
खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सापळा रचून अकलूज- इंदापूर रस्त्यावरील अकलूज हद्दीतील तांबोळी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकात शंकर महादेव चव्हाण (वय ४२, रा. जोशी गल्ली-बावडा, ता. इंदापूर) याला त्याच्याकडील मोटारसायकल (क्र. एमएच-४२ एडब्ल्यू-५०४५)च्या पेट्रोल टाकीवर एक नायलॉनचे प्रिंटेड असलेले पोते ठेवून त्यामध्ये सुमारे ८४ रुपये किमतीचा ५ किलो ६०० ग्रॅम गांजासह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याकडे १० हजार रुपये किमतीचा मोबाइल हँडसेट, ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण १ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलम २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक वैभव मारकड करत आहेत.