अकलूज-टेंभुर्णी रस्ता तीन तास रोखून धरला!
By दिपक दुपारगुडे | Published: February 24, 2024 07:00 PM2024-02-24T19:00:12+5:302024-02-24T19:00:24+5:30
सगेसोयऱ्यांना आरक्षणाचा कायदा पारित न केल्यामुळे राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तांबवे, गणेशगाव, वाघोली, लवंग, वापेगाव आणि बाबूळगाव येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीन तास रस्ता रोखून धरला. टेंभुर्णी रोडवर लवंग येथे रस्ता रोको आंदोलन करून घोषणा दिल्या. आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना व्यवस्थित शाळेपर्यंत जाण्याची व्यवस्था केली होती. रस्त्याच्या दोन्हीही बाजूने एक दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. आंदोलनावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊन सगेसोयऱ्यांना आरक्षणाचा कायदा पारित न केल्यामुळे राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
या रास्ता रोको आंदोलनासाठी लवंग गावचे सरपंच प्रशांत पाटील, पोलिस पाटील विक्रम भोसले, गणेशगाव तांबव्याचे समाधान मोरे, वाघोली गावचे गणेश शेंडगे, गुरुदेव मिसाळ, रवींद्र मिसाळ, विजय मिसाळ, अक्षय पाटील, साबळे, सौरभ ढोबळे, संपत जाधव, अमोल वाघ, शंभूराजे पाटील, गणेश पाटोळे, प्रताप मिटकल, रणजित पाटील, धनाजी पवार, आदित्य पवार, कुंडलिक मिसाळ, अभिजित पवार, तुषार पाटील, मयूर देशमुख, चेतन साळुंखे, दत्तात्रय खोचे, विशाल चव्हाण, विशाल पवार सहभागी झाले होते.