अकलूज जि.प. गटासाठी सव्वा कोटींचा विकास निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:28+5:302021-06-10T04:16:28+5:30
जि.प. शेष फंडातून सुजयनगर रस्ता खडीकरण, डांबरीकरण (५ लाख), जिल्हा नियोजन समितीतून वेळापूर-तांदूळवाडी ते महिम खडीकरण व डांबरीकरण (१० ...
जि.प. शेष फंडातून सुजयनगर रस्ता खडीकरण, डांबरीकरण (५ लाख), जिल्हा नियोजन समितीतून वेळापूर-तांदूळवाडी ते महिम खडीकरण व डांबरीकरण (१० लाख), अकलूज-सुजयनगर रस्ता खडीकरण व डांबरीकरण (१८ लाख), एफडीआर योजनेतून गिरझणी ते संग्रामनगर ग्रा.मा. २१९ रस्ता खडीकरण व डांबरीकरण (१० लाख). १५व्या वित्त आयोगातून बारभाई गट, शिवकृपा कॉलनी, समतानगर, जुने पोलीस स्टेशन, अकलाईनगर येथे आरओ प्लान्ट (१५ लाख).
जनसुविधा योजनेतून मुस्लीम कब्रस्तान येथे ओढ्यावर पूल बांधणे, औदुंबरनगर येथे रस्ता खडीकरण, चौंडेश्वरवाडी येथे रस्ता खडीकरण (२६ लाख), नागरी सुविधा योजनेतून राऊतनगर अंतर्गत रस्ते (१५ लाख), अंगणवाडी दुरुस्ती योजनेतून अकलूजमधील १३ अंगणवाड्या दुरुस्ती (१३ लाख), तीर्थक्षेत्र योजनेतून श्री अकलाई मंदिर येथील वॉल कम्पाउंड व वॉल कम्पाउंडवरील रिलिंग करणे (५ लाख), लघु पाटबंधारे योजनेतून निमगाव येथील धनाजी काटकर यांच्या शेतातून गेलेल्या ओढ्याचे खोलीकरण करणे (७ लाख), कृषी विभाग योजनेतून अकलूजमध्ये शनिमंदिर, डवरी गल्ली १०७० झोपडपट्टी सौरदिवे लावणे (४९ हजार ५००) आदी कामे केली जाणार आहेत.
चार लाख ६३ हजारांचे अनुदान वाटप
अनुदान योजनेतून झोपडपट्टी चॉपकटर, स्लरी फिल्टर, बॅटरी स्प्रे-पंप, ताडपत्री, एचटीपी, ब्रश कटर (१ लाख ४० हजार) इत्यादी वस्तू स्वरूपात शेतकऱ्यांना अनुदान दिले. महिला बालकल्याण योजनेतून महिला व मुलींना पिको-फॉल, मिरची कांडप, पिठाची गिरणी, सायकल वाटप (७४ हजार ९००), गरीब व होतकरू २० लाभार्थींना प्रशिक्षणासाठी ५० हजार व १८ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी ४५ हजार, समाजकल्याण योजनेतून मागासवर्गीय लाभार्थ्यांना शेळी गट, पिठाची गिरणी, ५ एचपी मोटर, अपंगांना अन्नधान्य वाटप, अपंगांना शेळी गट यासाठी एक लाख ५४ हजार रुपयांचे अनुदान वाटप केल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले.