दुधनीत मानकरी, पंचकमिटी सदस्यांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:14+5:302021-01-14T04:19:14+5:30
दुधनीत दरवर्षी मकर संक्रांतनिमित्त मोठी यात्रा भरते, मात्र यंदा कोरोनामुळे यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. यामुळे देवस्थान पंच कमिटीने ...
दुधनीत दरवर्षी मकर संक्रांतनिमित्त मोठी यात्रा भरते, मात्र यंदा कोरोनामुळे यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. यामुळे देवस्थान पंच कमिटीने केवळ धार्मिक विधी करण्याचा निर्णय
घेतला.
बुधवारी सकाळी अक्षता सोहळ्याचे मानकरी ईरय्या पुराणिक यांच्या हस्ते पोथी-पुराण ग्रंथाची पूजा करण्यात आली. त्या नंतर गाजावाजा न करता पोथी-पुराण सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. सिद्धेश्वर मंदिरासमोरील संमती कट्ट्याजवळ दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, सदस्य गिरमल्लप्पा सावळगी, सिद्दण्णा गुळगोंडा, हणमंतराव पाटील, मल्लिनाथ पाटील यांच्या हस्ते सुगडी पूजन करण्यात आले. त्यानंतर ईरय्या पुराणिक आणि चन्नवीर पुराणिक यांनी संमती वाचन व अक्षता सोहळा पार पडला. यावर्षी पोलीस प्रशासनाने नंदीध्वज मिरवणुकीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मानाच्या पाच नंदीध्वजांपैकी केवळ दोनच नंदीध्वजांना सिद्धेश्वर मंदिरात एका ठिकाणी ठेवून तेथेच विधिवत पूजन केले.
यावेळी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, मलकाजप्पा अल्लापूर, श्रीमंतप्पा परमशेट्टी, बसण्णा धल्लू, सुभाष परमशेट्टी, शिवानंद माड्याळ, सिद्धाराम मल्लाड, लक्ष्मीपूत्र पाटील, मलकण्णा गुड्डोडगी, मल्लिनाथ येगदी, गुरुशांत ढंगे, अप्पू मंथा उपस्थित होते.
फोटो
१३दुधनी०१
ओळी
दुधनी ता.अक्कलकोट येथील श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याप्रसंगी डॉ शांतलिंगेश्वर महास्वामी, मानकरी व मंदिर समिती सदस्य.