पंजाबी मशीनची किमया न्यारी, तुरीची रास झटक्यात होई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:46 AM2020-12-17T04:46:25+5:302020-12-17T04:46:25+5:30

अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात तूर उत्पादकांनी या मशीनच्या माध्यमातून रास करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. वास्तविक पारंपरिक पद्धतीने तुरीची ...

Alchemy of Punjabi machine | पंजाबी मशीनची किमया न्यारी, तुरीची रास झटक्यात होई!

पंजाबी मशीनची किमया न्यारी, तुरीची रास झटक्यात होई!

Next

अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात तूर उत्पादकांनी या मशीनच्या माध्यमातून रास करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. वास्तविक पारंपरिक पद्धतीने तुरीची रास करण्यासाठी मजुरांच्या मदतीने अगोदर कापणी करावी लागते. त्यानंतर कापलेले पीक गोळा करून मळणी मशीनच्या साह्याने रास करावी लागते. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतात. यामध्ये कामास लावलेल्या प्रत्येक मजुराला दिवसाकाठी ३०० ते ३५० रुपये मजुरी द्यावी लागते. एका एकरासाठी जवळपास पाच मजुरांना दिवसभर घेऊन रास करावी लागते. मात्र कमी वेळेत आणि कमी पैशात पंजाबी मशीनवर ही रास पूर्ण होते. पंजाबी मशीनसाठी एकरी १३०० ते १४०० रुपये भाडे घेतले जाते. यामुळे शेतकरी पंजाबी मशीनच्या साह्याने रास करण्यावर भर देत आहेत, असे डोंबरजवळगेचे शेतकरी मुन्ना होदलुरे यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::

शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुरीची रास करण्यासाठी पंजाबी हार्वेस्टर मशीन उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे पंजाबमधील शेतकऱ्यांशी संपर्क ठेवून दरवर्षी मशीन मागवत आहे. याच मशीनद्वारे रास करण्यासाठी प्रतिवर्षी वाढच होत आहे.

- विश्वनाथ भरमशेट्टी

शेतकरी, हन्नूर

फोटो

१६चपळगाव

ओळी

डोंबरजवळगे येथे पंजाबी मशीनच्या साह्याने तुरीची रास होत असून, ते पाहण्यासाठी जमा झालेले शेतकरी.

Web Title: Alchemy of Punjabi machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.