Shivjayanti: सोलापुरात कडब्यापासून अर्ध्या एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा; पाहा VIDEO

By appasaheb.patil | Published: February 17, 2021 12:51 PM2021-02-17T12:51:24+5:302021-02-17T13:12:35+5:30

सोलापुरातील युवकांची कल्पना; शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवरायांचा जागर

The alchemy of Shiva devotees; Image of Sakarali Shivaraya in half an acre from Kadaba | Shivjayanti: सोलापुरात कडब्यापासून अर्ध्या एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा; पाहा VIDEO

Shivjayanti: सोलापुरात कडब्यापासून अर्ध्या एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा; पाहा VIDEO

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - सोलापूर शहरापासून अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर म्हणजे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे गावात महाविद्यालयीन युवकांनी एकत्रित येऊन अर्ध्या एकरात कडब्यापासून शिवरायांची प्रतिमा साकारली आहे. या आगळ्या वेगळ्या प्रतिमेला पाहण्यासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींची मोठी गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड महाविद्यालयातील प्रतिक तांदळे या विद्यार्थ्यांने ही प्रतिमा अर्ध्या एकर शेतामध्ये केली आहे. ही प्रतिमा पूर्णपणे पर्यावरण कुलीत असून ज्वारीचे रोप वाळवून त्यापासून ही प्रतिमा बनवली आहे. ह्या प्रतिमेला तयार करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागला. ह्या प्रतिमेची लांबी १४० फूट व रुंदी ७५ फूट एवढी आहे. 

यासाठी प्रतिक तांदळे, अभिजय गायकवाड, विवेक उरडे, सुमित काटाळे, गौरव शिंदे, अभिषेक बोरकर, प्रदीप शिंगाडे, समर्थ जोशी, बालाजी आंबुरे या युवकांनी मोठी मदत केली आहे. 

दरम्यान, यापुर्वीही प्रतिक तांदळे मित्र परिवाराने गणेशोत्सवात गणपतीची भव्यदिव्य प्रतिमा साकारली होती. या शिवरायांची सुंदर प्रतिमा पाहून शहर व जिल्ह्यातील शिवभक्त पाहण्यासाठी गर्दी करीत असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: The alchemy of Shiva devotees; Image of Sakarali Shivaraya in half an acre from Kadaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.