मोदी यांच्या दौऱ्यासाठी खबरदारी; नवीन कोणी राहत असल्यास लगेच पोलिसांना कळवा!

By रवींद्र देशमुख | Published: January 16, 2024 05:10 PM2024-01-16T17:10:46+5:302024-01-16T17:11:42+5:30

जिल्ह्यात ४ फेब्रुवारीपर्यंत दक्षता. 

Alert for Modi's visit If someone new lives there notify the police immediately! | मोदी यांच्या दौऱ्यासाठी खबरदारी; नवीन कोणी राहत असल्यास लगेच पोलिसांना कळवा!

मोदी यांच्या दौऱ्यासाठी खबरदारी; नवीन कोणी राहत असल्यास लगेच पोलिसांना कळवा!

रवींद्र देशमुख, सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हयात नवीन राहण्यासाठी येणारे व्यक्ती, याची माहिती असणे अत्यंत गरजेचे असून, घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, मस्जिद, चर्च, धर्मशाळाचे विश्वस्त यांनी नव्याने राहण्यासाठी आलेल्या अनोळखी व्यक्तींची  त्यांच्या वास्तव्यासंबंधिची संपुर्ण माहिती न चुकता  संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे केले आहे.

जिल्हयात जी- जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल अथवा रहावयास आल्यावर अथवा रहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर तसेच नवीन जुने वाहन घेण्यास येणाऱ्या व्यक्तीची न चुकता संबंधित पोलीस ठाणेला महिती  उपलब्ध करुन द्यावी. 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे  आदेश जारी केले आहेत.

एखादी अनुचित घटना अगर देशविघातक कृत्य घडू नये याकरीता प्लॉट, लॉज, मठ, धर्मशाळा, चर्च, मशीद, मंदीर व खाजगी निवसस्थाने या ठिकाणी अनोळखी अथवा संशयित इसमास त्याची ओळख पटल्याशिवाय राहण्यास परवानगी देवु नये. भाडेकरु कडून रहिवाशी व ओळख असलेला पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती घ्याव्यात.

एखादी अनुचित घटना अगर देशविघातक कृत्य घडू नये याकरीता स्फोटक पदार्थ, बार उडणारे पदार्थ सोबत बाळगू नये, तसेच गॅस, केरोसीन, डिझेल, पेट्रोल याचा वापर अत्यंत काळजीपुर्वक करुन सुरक्षीत ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Alert for Modi's visit If someone new lives there notify the police immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.