कृषी कायद्याच्या विरोधात करमाळ्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:43 AM2021-02-05T06:43:28+5:302021-02-05T06:43:28+5:30

आंदोलनाचे नेतृत्व दशरथ कांबळे, ॲड. सविता शिंदे, डॉ. अमोल दुरंदे यांनी केले. २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे जो ...

All-party holding agitation in Karmala against agricultural law | कृषी कायद्याच्या विरोधात करमाळ्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

कृषी कायद्याच्या विरोधात करमाळ्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Next

आंदोलनाचे नेतृत्व दशरथ कांबळे, ॲड. सविता शिंदे, डॉ. अमोल दुरंदे यांनी केले.

२६ जानेवारी रोजी दिल्ली येथे जो हिंसाचार घडवून आणला त्याचा धरणे आंदोलनात निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनांच्या ठिकाणचे पाणी व वीजपुरवठा बंद केला. आंदोलकांवर दबाव टाकणे, धमकावणे अशी कृती चालू केलेली असून, त्याचाही तीव्र निषेध करण्यात आला.

करमाळा येथील आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, प्रहार, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार संघर्ष समिती, भारिप बहुजन महासंघ, भीम दल, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

धरणे आंदोलनामध्ये विजया कर्णवर, गजानन ननवरे, नलिनी जाधव, दादासाहेब लबडे, आर. आर. पाटील, सुदर्शन शेळके, सुनील भोसले, संदीप तळेकर, अमोल घुमरे, दीपक शिंदे, बापू फरतडे, नानासाहेब मोरे, संजय घोलप, कय्युम शेख, बापू फरतडे, गणेश सव्वाशे, अमित घोगरे, अतुल वारे, अमोल कुलकर्णी, महेश कुमार कुलकर्णी, विशाल गुणवरे, तानाजी झोळ, संदीप मारकड, शहाजी देशमुख, राजाभाऊ कदम, मधुकर मिसाळ, औदुंबर मोरे, बापू कोकरे, शंकर पोळ, गायत्री कुलकर्णी, बापू वाडेकर, दादासाहेब जाधव, पांडुरंग गायकवाड, कविता जाधव, सोमनाथ वाघमारे, बाळू कारंडे, मानसिंग खंडागळे, संदीप माकड, बापू वाडेकर, स्वप्नील गोडगे, प्रमोद बदे, संतोष वारे, उदयसिंह मोरे पाटील, भास्कर पवार, प्रशांत तकीक, अविनाश डावरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नांवर पथनाट्य सादर केले. आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार बदे व जाधव यांनी स्वीकारले.

----

फोटो ओळी :

२९करमाळा-आंदोलन

कृषी कायद्याच्या विरोधात करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी सर्वपक्षीय कार्यकर्ते.

----

Web Title: All-party holding agitation in Karmala against agricultural law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.