करमाळ्यात सर्वपक्षीय कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:30+5:302020-12-09T04:17:30+5:30

करमाळा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी ...

All-party strictly closed in Karmala | करमाळ्यात सर्वपक्षीय कडकडीत बंद

करमाळ्यात सर्वपक्षीय कडकडीत बंद

Next

करमाळा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शेतकरी संघटना, मित्र पक्ष हमाल पंचायतीच्यावतीने करमाळा बंदचे आवाहन केले होते, त्यानुसार आज शंभर टक्के करमाळा बंद ठेवण्यात आला.

शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी सर्वांनी या भारत बंदमध्ये सामील होण्यासाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुनीलबापू सावंत यांनी आवाहन केले होते. त्यानुसार आज शंभर टक्के करमाळा बंद ठेवण्यात आले आहे.

यावेळी सोलापूर शिवसेना ता. प्रमुख सुधाकर लावंड, शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख दशरथ कांबळे, हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवराज जगताप, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण कटारिया, शिवसेनेचे संजय शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या ॲड. सविता शिंदे, नगरसेवक सचिन घोलप, विजय लावंड, सचिन गायकवाड, विजयमाला चवरे, शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, संजय शीलवंत, सचिन काळे, राहुल पवार, अमोल यादव, अण्णा सुपनवर, अभिषेक आवाड, भीमदलचे सुनील भोसले, माजी नगरसेवक फारूक जमादार, बाळासाहेब क्षीरसागर, नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक अतुल फंड, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आझाद शेख, भोसेचे सरपंच भोजराज सुरवसे, राजेंद्र काळे उपस्थित होते.

यावेळी बहुसंख्येने शेतकरी अभिजीत सावंत, देवा लोंढे, फारूक बेग, डाॅ. अमोल दुरंदे, सूर्यकांत सामसे, बापृू उबाळे, बाळासाहेब रोडे, नागेश उबाळे, शुभम बनकर आदी उपस्थित होते. करमाळा बंद शंभर टक्के शांततेत झाला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

फोटो ओळी : ०८करमाळा-बंद

करमाळा शहरात बंदमध्ये शंभर टक्के व्यापारी सहभागी झाले.

---केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी कृषी कायदा संसदेत मंजूर करून घेतला आहे. हा कृषी कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असून, हा कायदा फक्त मोठे उद्योगपती अंबानी, अदानीसाठी केले आहे. आपण जर वेळीच विरोध केला नाही तर शेतकऱ्यांच्या नावावर सात-बारासुद्धा राहणार नाही.

- सुनील

सावत,

सरचिटणीस, जिल्हा काँग्रेस.

Web Title: All-party strictly closed in Karmala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.