मोठी बातमी; भीमा नदी डिकसळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद
By Appasaheb.patil | Published: January 17, 2023 11:41 AM2023-01-17T11:41:11+5:302023-01-17T11:41:28+5:30
वाहनधारकांनी नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे.
सोलापूर : करमाळा तालुक्यातील जिल्हा हद्द ते कोंढार चिंचोली खातगाव पोमलवाडी रस्ता प्र. जि. मा. १९० वरील भीमा नदीवरील ब्रिटिशकालिन सुमारे १६५ वर्षे जुना असलेल्या डिकसळ पुलाचा काही भाग क्षतीग्रस्त झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरील सर्व प्रकारची (जड, हलकी व इतर) वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
दरम्यान, या बाबतची वाहनधारकांनी नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देणारा फलक पुलाशेजारी लावलेला आहे. मंगळवारपासून याबाबतची कार्यवाही बांधकाम विभागाने सुरू केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावर जड वाहतूक सुरूच होती. मात्र बांधकाम विभागाने पुलाची चाचणी केल्यानंतर हा पुल क्षीतग्रस्त झाल्याचे निर्दशनास आले असून या पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक बांधकाम विभागाने नुकतीचे प्रसिध्दीस दिले आहे.