भूसंपादन मोबदला वाटपात गैरव्यवहाराचा आरोप;  प्रहारचे मंगळवेढ्यात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 04:14 PM2022-08-13T16:14:33+5:302022-08-13T16:14:39+5:30

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील जे काही शेतकऱ्यांना मोबदला वाटप केले आहे.

Allegation of malpractice in distribution of land acquisition compensation; Prahar fast on Tuesday | भूसंपादन मोबदला वाटपात गैरव्यवहाराचा आरोप;  प्रहारचे मंगळवेढ्यात उपोषण

भूसंपादन मोबदला वाटपात गैरव्यवहाराचा आरोप;  प्रहारचे मंगळवेढ्यात उपोषण

Next

मंगळवेढा: मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवर भुसंपादनातील  अन्याय विरुद्ध  शनिवार दिनांक १३ ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आहे. सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रहार संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ तयार करताना मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन केले गेले आहे पंरतु संबंधित शेतकऱ्यांना आजतागायत पर्यंत काही शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला नाही व ज्या शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला आहे त्या शेतकऱ्यांकडून ठराविक टक्केवारी घेऊन मोबदला दिला गेला आहे असा आरोप प्रहारने निवेदनात केला आहे.

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील जे काही शेतकऱ्यांना मोबदला वाटप केले आहे त्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात अफरातफर केले गेले असून संबंधित अधिकाऱ्यांवरती आजपर्यंत कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर काही गावातील पुढारी, प्रांत कार्यालयातील एजंट व प्रांत कार्यालयातील अधिकारी वर्गाने एकमेकांच्या संगनमताने आंधळगाव येथील सरकारी जमीन खाजगी दाखवून मोबदला लुटला असून संबंधित अधिकारी, पुढारी व एजंट वर कोणत्याही प्रकारची आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून आंधळगाव येथील जमीनीची अनाधिकृत पणे मोजणी करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली आहे म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवरती व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी. तसेच काही जमीनी हे वर्ग २ होते ते संबधित शेतकरी जमीन वर्ग १ केले आहेत, तरीही टक्केवारी साठी संबंधित शेतकऱ्यांच्या मोबदला दिला जात नाही.  म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावे यासाठी १३ ऑगस्ट २०२२ पासून प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राय्या माळी यांनी कार्यकर्त्यांसह उपोषण सुरू केले आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, जिल्हा युवा अध्यक्ष संतोष पवार, प्रहार जनशक्ती पक्ष तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, मंगळवेढा  तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रहार अपंग क्रांती तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, युवराज टेकाळे, राहुल खांडेकर, नवनाथ मासाळ, अनिल दोंडमिसे, नागेश मुदगुल , दिलावर मुजावर, बाळु वाघमारे,बिरू शिंदे, प्रकाश शिंदे, निलेश कांबळे, मच्छिंद्र कांबळे व  पिडीत शेतकरी बांधव उपस्थित होते.

Web Title: Allegation of malpractice in distribution of land acquisition compensation; Prahar fast on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.