भांडवलदारांची धर्माशी युती धोकादायक - बी. जी. कोळसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 05:01 AM2018-01-31T05:01:18+5:302018-01-31T05:01:41+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानातून सर्वांचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या संविधानाची आज एक टक्काही अंमलबजावणी होत असलेली दिसत नाही. उलट धर्माशी युती साधून भांडवलदार फोफावले आहेत.
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानातून सर्वांचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या संविधानाची आज एक टक्काही अंमलबजावणी होत असलेली दिसत नाही. उलट धर्माशी युती साधून भांडवलदार फोफावले आहेत. ही युती धोकादायक आहे, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. पाटील यांनी दिला.
अॅड. गाजीओद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने मंगळवारी सायंकाळी दोन पुस्तकांचे प्रकाशन पार पडले. त्या निमित्त ‘लोकशाही, संविधान आणि न्यायसंस्थेसमोरील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, सेवानिवृत्त माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ उपस्थित होते.
प्रेम हनवते लिखीत आणि सय्यद शहा वायज अनुवादित ‘छत्रपती शिवाजी महाराज के मुस्लिम सिपेहसालार’या उर्दू पुस्तकाचे आणि प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी व इस्माईल सय्यद यांनी संपादन केलेल्या ‘मौलाना अबुल कलाम आझाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कोळसे पाटील म्हणाले, आज खरे बोलणाºयाला देशद्रोही ठरविले जाते. ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला त्यांचे वंशज आज सत्तेत आहेत. ते वास्तव जनतेला जगात राहू न देता काल्पनिक जगात जगायला सांगत आहेत. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले संविधान दिसत नाही.
शिक्षणाचे व्यापारीकरण संविधानात कुठेच सांगितले नसताना ते सर्रास होत आहे. नवी अर्थनिती मुठभर श्रीमंतांच्या सोईची बनली आहे.