५२ बचत गटांना १ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:41+5:302021-03-28T04:21:41+5:30

अनगर : राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत अनगर येथील बॅंक ऑफ बडोदा शाखेने बिटले, खंडोबाचीवाडी, कुरणवाडी (अ.), नालबंदवाडी, गलंदवाडी, पासलेवाडी, ...

Allocation of loans of Rs. 1 crore 5 lakhs to 52 self help groups | ५२ बचत गटांना १ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज वाटप

५२ बचत गटांना १ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज वाटप

Next

अनगर : राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत अनगर येथील बॅंक ऑफ बडोदा शाखेने बिटले, खंडोबाचीवाडी, कुरणवाडी (अ.), नालबंदवाडी, गलंदवाडी, पासलेवाडी, अनगर स्टेशन, काळेवाडी, कोंबडवाडी येथील ५२ महिला बचत गटांना १ कोटी ५ लाख रुपयांचे कर्जवाटप करुन त्यांच्या स्वावलंबत्वासाठी प्रयत्न केला आहे.

यातून महिलांनी शाश्वत उपजीविकेसाठी, कृषिसखी, उद्योगसखी यांच्या माध्यमातून पशूपालन, शेळीपालन, गोपालन, शेती, विविध मसाले, दुग्ध व्यवसाय, हस्तकला वस्तू, पापड उद्योग, शेवया, शिलाई मशीन, कापड दुकान या व्यवसायात रक्कम गुंतवीली आहे.

यामूळे कुटुंबाला आर्थीक हातभार लागण्यास मदत झाली आहे. नुकतेच येथील जगदंबा व वैष्णवी महिला बचत गटांना बँकेने प्रत्येकी ५ लाख रुपयांचे कर्ज शाखाधिकारी जगन्नाथ लोटके, कर्ज वितरण अधिकारी सुजीत सोनवणे, गणेश बडगंडी, वंदना हैनाळकर, पाचपीर गायकवाड, समाधान गुंड, मंजुर बागवान यांच्या हस्ते बचत गटाच्या अध्यक्ष सुनंदा गुंड, उज्वला ढेरे, सचिव वर्षा विष्णु गुंड, अनिता महादेव झांबरे, सदस्या रेखा गुंड, जया गुंड, शालन गुंड, उमा पवार, काजल थिटे, वैशाली झांबरे, उमा झांबरे, आशा धावणे, सुमन शिंदे, वैशाली सावंत, सुरेखा डवरी, रतन निकम, कविता थिटे, अनिता घोगरे, सुषमा उंबरे, राजश्री वराळे, सुभद्रा झांबरे यांना ही रक्कम दिली.

----

बँकेने दिलेले कर्ज हे कुटुंबाचा आर्थीक स्तर उंचावण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. या कर्जाची प्रामाणीपणाने परतफेड करत राहू.

- सुनंदा गुंड,

अध्यक्षा, जगदंबा बचत गट,

---

फोटो : २७ अनगर

जगदंबा व वैष्णवी महिला बचत गटांना कर्ज वितरीत करताना बडोदा बँक अनगरचे शाखाधिकारी जगन्नाथ लोटके, सुजीत सोनवणे, गणेश बडगंडी, वंदना हैनाळकर, सुनंदा गुंड, वर्षा गुंड

Web Title: Allocation of loans of Rs. 1 crore 5 lakhs to 52 self help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.