सांगोला नगर परिषदेतर्फे फिरत्या निधीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:20+5:302021-03-10T04:23:20+5:30
सांगोला नगर परिषदेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या योजनेंतर्गत महिला सशक्तीकरण व त्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले ...
सांगोला नगर परिषदेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या योजनेंतर्गत महिला सशक्तीकरण व त्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात. या अनुषंगाने सांगोला शहरामध्ये १३० महिला स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केले आहेत. बचत गटांना अंतर्गत कर्ज व्यवहारासाठी नगर परिषदेच्या वतीने १० हजार रुपये इतका फिरता निधी अनुदान म्हणून दिला जातो.
बचत गटाप्रमाणेच वस्तीस्तर संघासही फिरता निधी म्हणून नगर परिषदेकडून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. या अनुषंगाने सांगोला नगर परिषदेंतर्गत ७ वस्तीस्तर संघ स्थापन झाले असून ४ वस्तीस्तर संघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे २ लाख रुपये निधीचे वाटप केले आहे.
यावेळी एकलव्य वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा वैशाली पवार व सचिव सोनम काटे तर नवदुर्गा वस्तीस्तर संघाच्या सचिव अनिता लेंडवे उपस्थित होत्या. या कार्यक्रमास नगराध्यक्षा राणी माने, महिला व बाल कल्याण समिती सभापती अनुराधा खडतरे, नगरसेविका भामा जाधव, स्वाती मगर, छाया मेटकरी, सहा. प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे, क्षेत्रीय अधिकारी माविम राहुल खडतरे आदी उपस्थित होते.