नियम लावून केशकर्तनालय उघडण्यास परवानगी द्या : राम सातपुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:22 AM2021-04-09T04:22:59+5:302021-04-09T04:22:59+5:30
माळशिरस : ३० एप्रिल पर्यंत कडक निबंध लावण्यात आल्याने लघु व्यवसायांची पुरते हाल होत आहे. या बाबतीत सरकारने ...
माळशिरस : ३० एप्रिल पर्यंत कडक निबंध लावण्यात आल्याने लघु व्यवसायांची पुरते हाल होत आहे. या बाबतीत सरकारने सकारात्मक विचार करावा. प्रामुख्याने नाभिक समाजाबाबत हातावरील पोट असल्यामुळे दुकाने बंद ठेवून मोठे नुकसान होत आहे. यासाठी या दुकानांना नियम लावून केस कर्तनालयासाठी परवानगी द्यावी या आशयाचे पत्र आमदार राम सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
प्रामुख्याने सकाळी जमावबंदी व सायंकाळी संचारबंदी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकार व प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता कडक निर्बध लावले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यामधील तसेच इतर जिल्ह्यातील नाभिक समाजाचा उल्लेख करत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या ठिकाणी नाभिक समाजाला ठराविक नियम लावून केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.