वकील, इंजिनिअर अन् डॉक्टर यांच्यासह उच्चशिक्षित तरुण बनले ‘कोविड वॉरियर्स’
By appasaheb.patil | Published: May 15, 2020 11:38 AM2020-05-15T11:38:35+5:302020-05-15T11:41:41+5:30
सोलापूर ग्रामीण पोलिसांना मदत : २६०० वॉरियर्सची नेमणूक; ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न
सुजल पाटील
सोलापूर : भविष्यात पोलिसांची संख्या कमी पडू नये, यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने पोलिसांच्या मदतीला ‘सदैव आपल्या सेवेसाठी’ या छताखाली २६०० ‘कोविड वॉरियर्स’ची नेमणूक केली आहे़ त्यात वकील, इंजिनिअर, डॉक्टर, उच्चशिक्षित तरुणांनीही कोविड वॉरियर्सला पसंती दिल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊऩ़़ संचारबंदीची कडक अंमलबजावणी.. दिवस अन् रात्रभर नाकाबंदी.. पण पोलिसांची संख्या कमीच.. त्यात काही पोलीस कर्मचाºयांना कोरोनाची लागण... कोरोनाच्या खबरदारीसाठी ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना घरी थांबण्याचे आदेश़़़ अशातच पोलिसांची कमतरता जाणवू नये, नागरिकांची कामे वेळेत व सुरळीत व्हावीत, शहरात पसरत असलेला कोरोना आता ग्रामीण भागातही पसरत आहे. याच अनुषंगाने ही निवड केली.
दरम्यान, संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अर्थात कोरोना वॉरियर्स रस्त्यावर दिवसरात्र एक करून खडा पहारा देत आहेत. रस्त्यावर ये-जा करणाºयांची चौकशी अथवा कोरोनाबाधित परिसर प्रतिबंध करणे, कोरोना हॉटस्पॉट तसेच क्वारंटाईन असलेल्या ठिकाणी बंदोबस्त करणे, गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेणे अशी एक ना अनेक महत्त्वाची कामे पोलीस प्रशासन पार पाडत आहे.
दरम्यान, ही कामे पार पाडत असताना पोलिसांची संख्या कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसू लागल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कोविड वॉरियर्स ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तालुका पोलीस ठाण्यांतर्गत १५० तर स्टेशननिहाय १०० कोविड वॉरियर्सची नेमणूक केली आहे़ या वॉरियर्सना ओळखपत्र, सॅनिटायझर, मास्कही देण्यात आले आहे़ मनोज पाटील यांच्या या संकल्पनेला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
कोविड वॉरियर्स करू लागले ही कामे
- - परप्रांतीय, परजिल्ह्यात जाणाºया मजूर, नागरिकांना पास काढून देणे
- - गावात नव्याने बाहेरून येणाºया नागरिकांची माहिती कळविणे
- - गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य ती खबरदारी
- - गावातील गरीब, गरजू, सर्वसामान्य लोकांना मदत करणे
- - गावात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने लक्षणे दिसणाºया व्यक्तीची माहिती पोलिसांना देणे
पोलिसांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न
- कोविड वॉरियर्स यांना कोरोना या विषाणूजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली आहे़ काम करताना स्वच्छता, सुरक्षेबाबत काळजी घेणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, याबाबत कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकाºयांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे़ गावपातळीवर पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व कोविड वॉरियर्स हे सध्या ग्रामीण पोलिसांचे ३० ते ४० टक्के काम हलके करीत असल्याचा विश्वास अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी व्यक्त केला़
गावपातळीवर पोलिसांना मदत व्हावी, या हेतूने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पेतून कोविड वॉरियर्स ही संकल्पना राबवित आहोत़ जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे, स्टेशननिहाय गावागावात कोविड वॉरियर्सची नेमणूक करण्यात आली असून, त्यांना काय काम करावयाचे याबाबत प्रशिक्षण दिले आहे़ कोणाच्याही संपर्कात येऊ नये, यासाठी त्यांना नाकाबंदीच्या ठिकाणी काम दिले नाही़ पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व कोविड वॉरियर्स हे समन्वयाने काम करीत आहेत़
- अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण