आगळगावात विद्युत पोलवरील ॲल्युमिनियम तारा लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:22 AM2021-09-13T04:22:09+5:302021-09-13T04:22:09+5:30

कुसळंब : बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे पाठक डीपीवरील एलटी लाइनच्या २२ पोलवरील ६६ हजारांच्या ॲल्युमिनियम तारा लंपास करून ...

Aluminum wire lamps on electric poles in Agalgaon | आगळगावात विद्युत पोलवरील ॲल्युमिनियम तारा लंपास

आगळगावात विद्युत पोलवरील ॲल्युमिनियम तारा लंपास

Next

कुसळंब : बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे पाठक डीपीवरील एलटी लाइनच्या २२ पोलवरील ६६ हजारांच्या ॲल्युमिनियम तारा लंपास करून सोळा सिमेंटच्या पोल मोडून तोडून ४० हजारांचे नुकसान केले.

याबाबत अनंत पंडित मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता कळमवाडी येथून आगळगावकडे जात असताना पाठक डीपीवरील काही पोल पडलेले दिसले. जवळ जाऊन पाहिले असता पाठक डीपीवरून नागनाथ उकिरडे यांच्या शेताकडे जाणारा एलटी इनच्या एकूण आठ गाळ्यांतील ॲल्युमिनियमच्या तारा व तुकाराम वागळे, प्रकाश ठोंबरे यांच्याकडे जाणाऱ्या २० एलटी लाइन गाळ्यांपैकी १४ तारा गायब होत्या. डीपीचे एकूण सोळा पोल तुटून खाली पडून नुकसान झाल्याचे दिसले. याबाबत वरिष्ठ अधिकारी महेश भगवान झिंगाडे यांना याची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे हे करीत आहेत.

Web Title: Aluminum wire lamps on electric poles in Agalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.