अमराठी; पण मायमराठीची अजोड सेवा ! सोलापुरातील हे आहेत शारदेचे सेवक...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:51 PM2018-02-27T14:51:32+5:302018-02-27T14:51:32+5:30
ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा अनेकांनी मराठी भाषेची सेवा केलेली आहे. मायमराठीत विपुल साहित्य लेखन केले आहे. शिवाय विविध कलांचेही सादरीकरण केले आहे. मूलत: तेलुगू भाषिक असलेले कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे योगदान तर थक्क करणारे आहे. याशिवाय सोलापुरात असे अनेक मराठीप्रेमी अमराठी आहेत. मराठी हा आमचा श्वास असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर दि २७ : ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा अनेकांनी मराठी भाषेची सेवा केलेली आहे. मायमराठीत विपुल साहित्य लेखन केले आहे. शिवाय विविध कलांचेही सादरीकरण केले आहे. मूलत: तेलुगू भाषिक असलेले कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे योगदान तर थक्क करणारे आहे. याशिवाय सोलापुरात असे अनेक मराठीप्रेमी अमराठी आहेत. मराठी हा आमचा श्वास असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
हत्तरसंगकुडल येथील शिलालेखाचा संशोधक आनंद कुंभार, शाहीर डॉ. अजीज नदाफ आणि गझलकार बदिउज्जमा बिराजदार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या.
महाराष्ट्रात अहिरानी, चंदगडी, खान्देशी इत्यादी लोकभाषा आहेत़ आदिवासींच्या २२ भाषा आहेत़ तर भटक्या विमुक्त जमातीच्या ३ भाषा आहेत़ त्याप्रमाणे भटक्या विमुक्त जमाती सांकेतिक भाषा, नाथपंथी डवरी भाषा, वडारी वैदू भाषा आणि दखनी भाषा बोलणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे़ अभिजात दर्जाच्या दृष्टीने या सर्व बोलीभाषांचा समावेश मराठीत होणे गरजेचे आहे़
त्यादृष्टीने अलीकडच्या काळात विविध आदिवासी व भटक्या जमातीच्या लोकांनी मराठीत साहित्याची मोठी भर घातली आहे़ त्या दिशेने मराठीचा अभ्यास होणे गरजेचे आहे व त्याचे लेखन होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
----------------------
च्प्रा. डॉ. अजीज नदाफ हे मराठी साहित्यिक, मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. शिवाय एक दर्जेदार शायर म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. मराठी शाहिरीचा शोध हा प्रा. अजीज नदाफ यांचा मुख्य अभ्यास विषय आहे. उर्दू भाषिक असूनही ६१ वर्षांपासून मराठी भाषेचा दर्जा वाढविण्यासाठी नदाफ यांनी काम केले आहे़ मराठी शाहीर अमर शेख यांचे पोवाडे, लोकगीते व लावण्या नावाचे संकलन प्रकाशित केले आहे़ प्रा. फक्रुद्दीन बेन्नुर यांच्या समवेत डॉ. नदाफ यांनी १९८९ साली अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.
--------------------
आनंद कुंभार : मराठीतील पहिल्या शिलालेखाचा शोध
आनंद कुंभार हे सोलापूरचेच आहेत़ त्यांनी नाटक, कविता, लेख लिहिले़ इतिहासाचे संशोधन केले. १९७४ साली हत्तरसंगकुडल येथील रेवणसिद्धेश्वर मंदिरात मराठी भाषेतील पहिला शिलालेख शोधला. त्यानंतर १९७५ साली तो पुढे आला आणि त्याबाबतची माहिती १९८८ सालच्या पुस्तकात उतरविला गेला़
---------------
बदिऊज्जमा बिराजदार : मराठी गझलकार
बदिऊज्जमा बिराजदार हे मूळचे सोलापूरचे आहेत़ मराठी गझलकार म्हणून महाराष्टÑ त्यांना ओळखतो. त्यांनी विविध संमेलनात भाग घेतला ७१ व्या व ७९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात सहभाग, अ. भा. मराठी साहित्य परिषदेच्या अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाची मेजवानी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या गोवा व पणजी येथील १0 शेकोटी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष झाले. बेळगाव येथील मराठी साहित्य संमेलन यामध्ये बिराजदार यांना दाद मिळाली.