सांगोल्यात घराघरात आंबेडकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:36+5:302021-04-16T04:21:36+5:30
प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू केल्याने भीम अनुयायांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेसह पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी भीमसैनिकांनी ...
प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू केल्याने भीम अनुयायांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेसह पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी भीमसैनिकांनी आपल्या घरासमोर निळे झेंडे उभारून जयंतीचा आनंद द्विगुणित केला. यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने कोठेही गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहरासह तालुक्यातील विविध संस्था, सामाजिक संघटना, शासकीय कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भीमसैनिकांनी यंदाही मिरवणुका न काढण्याचा निर्णय घेतला. तसेच गर्दी रोखण्याठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जयंतीच्या निमित्ताने पुतळा परिसरात रंगरंगोटी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बनसोडे, तानाजी बनसोडे, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, नगरसेवक सूरज बनसोडे, नगरसेविका अप्सरा ठोकळे, ॲड. सागर बनसोडे, ॲड. नंद बनसोडे, शिरीष शिंदे, अरुण बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, शीतल खरबडे, एकनाथ बनसोडे यांच्यासह आबालवृद्ध भीमसैनिकांनी फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.