आंबेगावकरांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:20 AM2021-04-14T04:20:15+5:302021-04-14T04:20:15+5:30
बार्शी तालुक्याच्या टोकाला तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर ६८६ लोकसंख्येचे आंबेगाव. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकास क्वारंटाइन केले जात ...
बार्शी तालुक्याच्या टोकाला तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर ६८६ लोकसंख्येचे आंबेगाव. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकास क्वारंटाइन केले जात होते. तसेच गावामध्ये रोग प्रतिबंधात्मक औषधांच्या फवारण्या केल्या जात होत्या. कोणी संशयिताने संसर्ग लपवू नये म्हणून आतापर्यंत गावात ३५० पेक्षा जास्त नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेतजी आहे. यामध्ये कोणीही बाधित आढळले नाही. विशेष बाब म्हणजे गावात एखादे लग्न असले तरी त्याठिकाणी ही तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. एखादी व्यक्ती जर गावाबाहेर लांब प्रवास करून आली असेल तर तिने लगेच तपासणी करून घ्यायची, असा नियमच केला आहे.
४५ वर्षांपुढील ग्रामस्थांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण
प्रथम ६० वर्षांपुढील ११८ वृद्धांचे लसीकरण केले. त्यानंतर दुर्धर आजार असलेल्या ८ तर दुसऱ्या टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटातील १०७ ग्रामस्थांचे लसीकरण करून घेतले. म्हणजे ४५ वर्षे वयोगटापुढील सर्व १०० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आज या सर्वांचे आरोग्य सुरक्षित झाले आहे. गावाच्या संपर्कात अति जोखमीतील ग्रामस्थ येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुटीच्या दिवशी लसीकरण करून घेतले. तसेच रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून सामाजिक बांधिलकी जपत ५१ जणांनी रक्तदानही केले.
हे आहेत खरे कोरोना योद्धे
प्रा. आनंद सुरवसे, नानासाहेब साळुंखे, नेताजी दळवे, इनूस सय्यद, शिवाजी दळवे, बालाजी भुसारे, प्रशांत दळवे, प्रदीप मस्के, अमर गायकवाड, सरपंच सुशीलकुमार दळवे, उपसरपंच ललिता साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य इंद्रजित माळी, नामदेव मस्के, निर्मला काळे, निर्मला दळवे, माधुरी माळी, ग्रामसेवक कल्याण काशीद, पोलीस पाटील राजाभाऊ दळवे, अंगणवाडी सेविका केशर दाभाडे, मदतनीस उषा दाभाडे, प्राथमिक शिक्षक नामदेव शेंडगे, संजय गणेचारी, सामाजिक कार्यकर्ते शहाजी दळवी, आशा वर्कर, आरोग्य सेविका यांचे मोठे योगदान आहे़
कोट :::::::::
गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या या कोरोनाविरुद्धच्या लढाईत आंबेगावातील जनतेचे योगदान मोलाचे आहे. प्रशासनाच्या नियमासोबतच स्वत:च्या जिवाची आणि कुटुंबाची काळजी घेत नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले व त्यांचे लसीकरण करून घेतले.
- सुशीलकुमार दळवे, सरपंच
---
१२बार्शी-आंबेगाव
आंबेगाव, ता. बार्शी ग्रामस्थांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी काम करणारे हे कोरोना योद्धे.