निवडीमध्ये आरक्षण नियमांची सुधारणा झाली; सोलापुरातील दोनशेहून अधिक तरूणांना नोकरी मिळाली
By Appasaheb.patil | Published: March 21, 2023 03:23 PM2023-03-21T15:23:34+5:302023-03-21T15:23:55+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यामधील नॅशनल हेल्थ मिशन व १५ वित्त आयोगाची भरती प्रक्रिया पार पडण्यात आली होती.
सोलापूर : चुकीचे आरक्षण नियमांमध्ये दुरूस्ती करून सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नव्याने उमेदवारांच्या भरतीची नवीन यादी प्रसिध्द केल्याने दोनशेहून अधिक तरूणांना नोकरी मिळाली. या निवडीचे नियुक्ती पत्र तरूणांना वाटप करण्यात आले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यामधील नॅशनल हेल्थ मिशन व १५ वित्त आयोगाची भरती प्रक्रिया पार पडण्यात आली होती. त्यामध्ये स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू वैद्यकीय अधिकारी लॅब टेक्निशियन ई पदाची जाहिरात निघाली होती. सदर पदाची परीक्षा घेण्यात आली होती व त्यानुसार निवड प्रक्रिया जाहीर केली त्या निवड प्रक्रियेमध्ये आरक्षणाच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आले होते, त्यावर तात्काळ स्थगिती येऊन नव्याने निवड यादी प्रसिद्ध करण्याची मागणी बसपाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली.
मागील दोन महिन्यात प्रवीण कांबळे यांनी अभ्यासपूर्वक मांडणी करून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, त्याला अखेर यश आले सदर निवड प्रक्रियेमध्ये एससी, एसटी, ओबीसी, एनटी, ईडब्ल्यूएस असे अनेक उमेदवार बाहेर पडलेल्यांना नोकरी मिळाली. त्यांना नियुक्ती पत्रांचेही वाटप करण्यात आले. हे काम यशस्वी होण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव आप्पासाहेब लोकरे यांचे सहकार्य लाभले. यासाठी बहुजन समाज पार्टीचेचे प्रविण कांबळे यांनी पाठपुरावा केला होता.