अमिताभ बच्चन यांनी विठ्ठलाचे फोटो केले रिट्विट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:35+5:302021-05-31T04:17:35+5:30
सोलापूर : हिंदी चित्रपट सृष्टीतील बिग बी अमिताभ बच्चन यांनी रविवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी ...
सोलापूर : हिंदी चित्रपट सृष्टीतील बिग बी अमिताभ बच्चन यांनी रविवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे फोटो रिट्विट करत विठ्ठलाप्रती भक्ती जागृत केली.
पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेस सुंदर पोशाख परिधान करून दररोज नित्य पूजा केली जाते. नित्य पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुंदर पोशाखातील फोटो ट्विटरवर अपलोड केले जातात. हेच अपलोड केलेले सुंदर फोटो पाहून रविवारी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मंदिर समितीने किशोरवर टाकलेल्या फोटोला रिट्विट करून, आपण विठ्ठल भक्त असल्याचे दाखवून दिले. बच्चन यांनी ट्विट केलेल्या फोटोला राज्यातूनच नव्हे, तर देशभरातील विविध सेलिब्रिटींनी याच विठ्ठल यांच्या फोटोला रिट्विट केले आहे.
दरवर्षी पंढरपुरात साजरी होणाऱ्या आषाढी एकादशीला अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर विठ्ठलाचा फोटो शेअर करत, आषाढी एकादशीच्या मराठी भाषेतून शुभेच्छा देतात.
आषाढी एकादशीनिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, बिग बींनी या शुभेच्छा मराठीमधून दिल्या आहेत. अमिताभ यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देताना, एक सुंदर विठ्ठल-रखुमाईचा फोटो शेअर केला आहे. ‘देवशयनी #आषाढीएकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना, वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा!!’ असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. बिग बी प्रत्येक आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देतात. इतर दिवशीही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरातील फोटो शेअर करताना दिसतात, शिवाय इतर दिवशीही ते फोटो शेअर करीत विठ्ठलाप्रती भक्ती जागृत करतात.
-------------------------
भक्ती जागृत...
ये व्यक्तित्व की गरिमा है की, फूल कुछ नहीं कहते...
वरना, कभी कांटों को मसलकर दिखाईये...' असा फोटोखाली चार ओळींचा मजकूर टाकला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या फोटोला देशभरातून पाचशेहून अधिक लोकांनी रिट्विट करत महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी मातेविषयी आपली भक्ती जागृत केली आहे.