'शिवरत्न'वरून परिचारक जाताच राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड दाखल
By राकेश कदम | Updated: March 27, 2024 14:28 IST2024-03-27T14:24:30+5:302024-03-27T14:28:53+5:30
अकलूजमध्ये पुन्हा हालचाली वाढल्या

'शिवरत्न'वरून परिचारक जाताच राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड दाखल
राकेश कदम/ राजू लोकरे, अकलूज: माढा लोकसभा मतदारसंघात भाजप नेते आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आणि कुटुंबीयांनी बंडखोरी करू नये यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक बुधवारी सकाळी अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले. परिचारक आणि मोहिते पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. प्रशांत परिचारक शिवरत्न बंगल्यावरून बाहेर पडतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड बंगल्यावर दाखल झाले. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे संकेत मिळत आहेत.
खासदार अमोल कोल्हे आणि प्रवीणदादा गायकवाड यांचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वागत केले. यावेळी धैर्यशील यांचे काका जयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. कोल्हे आणि मोहिते पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. धैर्यशील हे लवकरच हातात तुतारी घेतील असे जयसिंह यांनी सांगितले.