राज्याच्या आर्दश शाळांमध्ये सोलापूर झेडपीच्या १३ शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:16+5:302021-03-10T04:23:16+5:30
नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचाही विकास व्हावा हा शासनाचा हेतू आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यात राज्यातील ३०० ...
नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचाही विकास व्हावा हा शासनाचा हेतू आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यात राज्यातील ३०० व त्यामध्ये सोलापूरच्या १० शाळांचा समावेश असलेली यादी जिल्हा परिषदांना पाठवली होती. मात्र त्यात बदल करण्याचा अधिकार जिल्हा परिषद सीईओ व शिक्षणाधिकाऱ्यांना दिला होता. त्यामुळे राज्यातच काही शाळांना वगळून नव्याने काही शाळांचा यामध्ये समावेश केला आहे.
मोहोळ तालुक्यातील आष्टी शाळेची निवड रद्द करुन नव्याने पापरी शाळेचा समावेश ५ मार्च रोजी काढलेल्या आदेशात केला आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी व शहरातील दोन शाळांचा यामध्ये समावेश केला आहे.
या शाळांचा समावेश
बीबीदारफळ (उत्तर तालुका), बोरामणी (दक्षिण सोलापूर), सातनदुधनी (अक्कलकोट), मानेगाव (बार्शी), वाशिंबे (करमाळा), माढा (माढा), महाळूंग (माळशिरस), पापरी (मोहोळ), ढवळस मंगळवेढा), महुद बुद्रुक (सांगोला), रांझणी (पंढरपूर), एम.एन.सी. उर्दु मुले-५ व एस.एस.एन.सी. प्रशाला-१ कॅम्प
--
यात गावकऱ्यांचीच जबाबदारी
नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर या निवडलेल्या शाळांचा भौतिक व शैक्षणिक विकास करण्याची जबाबदारी जेवढी प्रशासक, शिक्षकांची आहे तेवढीच नागरिकांचीही आहे. आर्दश शाळा (माॅडेल स्कूल) च्या शासनाच्या २६ ऑक्टोबर व ५ मार्चच्या आदेशात शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या सोई- सवलतींचा उल्लेख केला आहे.
----